शिक्षक बॅंकेची खरेदी जादा दराने

माळवे यांचा आरोप; वचननाम्याला सत्ताधाऱ्यांकडून हरताळ

नगर – नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या मागच्या निवडणुकीच्या वेळी सध्याच्या सत्ताधारी गुरूमाउली मंडळाने अनावश्‍यक खर्चात कपात करण्याचे जाहीर केले होते; परंतु प्रत्यक्षात बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी करून संचालक मंडळाने गैरव्यवहार केल्याचा आरोप सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर माळवे यांनी केला आहे.
माळवे यांनी गुरूमाउलीच्या वचननाम्यातील वचन क्रमांक पाच निदर्शनास आणले. त्यात अनावश्‍यक खर्चात कपात करणार व वचन क्रमांत एकमध्ये स्वच्छ व पारदर्शी कारभार करण्याचे आश्‍वासन दिले होते, तरीही संचालक मंडळाने नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या विविध शाखांत बाजारभावापेक्षा अत्यंत चढ्या दराने खरेदी केली. गरज नसताना विविध प्रकारची खरेदी केली. मनमानेल तशा पद्धतीने संचालकांनी उधळपट्टी केली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
माळवे यांनी दिलेला खरेदीचा तपशील असा-श्रीरामपूर -चेक बुक स्कॅनर प्रिंटर खरेदी (65 हजार ारशे रुपये), श्रीगोंदे-एक्‍साईड बॅटरी खरेदी (34 हजार रुपये), पाथर्डी-नीलकमल खुर्ची खरेदी-(1148 रुपये), नेवासे-वीजपंप खरेदी (2900 रुपये), एक्‍साईड बॅटरी खरेदी (67 हजार 713 रुपये), पारनेर-पत्र्याची पेटी (712 रुपये), कोपरगाव- फायबर खुर्ची- (2590 रुपये), लोखंडी कपाट- (28 हजार 625 रुपये), एअर कंडिशनर (ए.सी.)-(44 हजार 990 रुपये), सी सीसीटीव्ही सिस्टम-(चार हजार 406 रुपये), कर्जत-सीसीटीव्ही रिमोट कंट्रोल खरेदी-(आठ हजार 620 रुपये), जामखेड-बॅटरी-(साडेतीन हजार रुपये), खुर्ची- (820 रुपये), रिमोट व सेल- (360 रुपये), अकोले-नीलकमल खुर्ची खरेदी-(एक हजार 640 रुपये).
या बॅंकेने खर्चाबाबत योग्य ते धोरण आखलेले दिसत नाही. किती रकमेच्यावर निविदा मागवाव्यात, हे ठरलेले दिसत नाही. बॅंकेने खर्चाबाबत योग्य ते एकसूत्री धोरण ठरवावे, असा शेरा अनिल मार्डीकर अँड कंपनीने लेखापरीक्षण अहवालात मारला आहे.
वचननामा व प्रचारातील घोषणा म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडेच ठरले आहेत. सभासदांनी संचालकांना आप-आपल्या तालुक्‍यात जाब विचारावा, असे आवाहन सदिच्छा मंडळाचे राजेंद्र शिंदे, रवींद्र पिंपळे, बाळू मोरे, अनिल टकले, धर्मा बडे, बाळासाहेब आरोटे, संजय खामकर,नवनाथ काळे, चंद्रकांत मोरे, सुनिल राहणे, शंकर गाडेकर, संतोष भोंडवे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)