शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शोभा वहिले बिनविरोध

वडगाव मावळ – मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कान्हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा सुधीर वहिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

येथील मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात अध्यासी अधिकारी संतोष लादे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत शोभा वहिले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, नगरसेवक पूजा वहिले, शारदा ढोरे, राहुल ढोरे, संतोष मुऱ्हे, उद्योजक सागर बोडके, ओबीसी अध्यक्ष अतुल राऊत, विस्ताराधिकारी गजानन बुरकुले, माजी सरपंच पोपट वहिले, बाबासाहेब औटी, संदीप कांबळे, बाळासाहेब शिंगाडे, रमेश गायकवाड, राजू भेगडे, जितेंद्र सावंत, रमेश बनसोडे, शालिनी ढवळे, सुजाता तारळकर, निर्मला काळे, अरुण वाघमारे, सुधीर वहिले आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवनिर्वाचित अध्यक्षा शोभा वहिले म्हणाल्या की, मावळ तालुक्‍यातील 751 सभासद असलेली पतसंस्था असून 12 कोटीचे भागभांडवल, 2 कोटी, 50 लाख रुपयांच्या मुदत ठेवी आहे. 21 कोटी कर्ज वाटप केले आहे. पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 25 कोटी रुपयांची आहे. या पतसंस्थेच्या आर्थिक उन्नतीसाठी कायमच अग्रेसर राहणार आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन संचालक प्रमोद भोईर यांनी केले. आभार ज्येष्ठ संचालक अनिल कळसकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)