#शिक्षक दिन : !!  शिक्षक !! (प्रभात open house)

शिक्षक म्हणजे…. विशाल वृक्ष..
फांदीफांदीतून सळसळतात..
ज्ञानाची पाने
भावनांच्या डोहात भिजून
नतमस्तक होतात

निरागस अक्षरे. ..! असतो खरा शाळेचा
संशोधक शास्त्रज्ञ
समाजसुधारकही तोच..
क्रांतिकारकही तोच..

समर्थ तत्वज्ञानाचे पाठबळ
असते कित्येक चेतनांना
आकार द्यावा लागतो
मुक्तपणे बागडणार्‍या
निराकार चैतन्याला …!

चमकतात उजेडाची किरणे
उद्दिष्टांच्या वाटेवर
असतात सोबतीला
खडूची धारधार तलवार नी
फळयाची ढाल. .!

अंधार संपून येईल
उजेडाचे राज्य
शिक्षक म्हणून त्यांची प्रतिमा. .
दिसेल स्पष्ट. ..!!

– संगीता कुलकर्णी (लेखिका /कवयित्री) 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)