शिक्षक दिन विशेष : शिक्षकांची प्रतिमा बदलली, पण प्रश्‍न कायम!

– श्रध्दा कोळेकर

पुणे – हल्ली मध्यमवर्गीय घरातील मुलांनाही पालक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालताना दिसतात. अर्थातच, याला अपवाद आहेत. परंतु सर्वसाधारण विचार करता सर्वत्र पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांकडे वाढला आहे. त्यामुळे आपसूकच घराघरांत बोलला जाणारा “बाई’ हा शब्द जाऊन आता त्या जागी “मिस’ किंवा “टीचर’ हा शब्द आला आहे. बाईंची एक ठाराविक प्रतिमाही बदलली आहे. मात्र खरोबरच बाईंऐवजी आलेल्या “टीचर’चे प्रश्‍न खरोखरच बदलले आहेत का, असा प्रश्‍न या शिक्षक दिनाच्या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हल्लीच्या मुलांच्या शाळांचे शुल्क हे कधी-कधी पालकांच्या सहा महिन्यांच्या पगाराइतके असते. परंतु अशातही पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळांमध्येच घालण्याचा अट्टाहास करतात. पूर्वी हीच गत अनुदानित चांगल्या नामांकित मराठी शाळांसाठी होती. परंतु, एवढी मोठाली शुल्क भरुन आपण ज्या शाळेत मुलांना घातलो त्या शाळेतील शिक्षक प्रशिक्षित असतात का, त्यांना योग्य मानधन दिलं जातं का याचा मागमूसही पालकांना नसतो. मात्र याचा परिणाम अर्थातच आपल्या मुलांवर होणार असतो.

हल्ली अनेक पालकांच्या तोंडून या मिस सोडून गेल्या, या नवीन आल्या, मुलांना शिकवायला शिक्षकच नाही, अशा प्रकारची वाक्‍य ऐकायला मिळतात. लाखो रुपये शुल्क देऊनही अनेक इंग्रजी शाळांमध्ये ही बाब ऐकायला मिळते. याचे कारण शिक्षकांची प्रतिमा जरी बदलली असली तरीही शिक्षकांचे प्रश्‍न मात्र कायम आहे. आजही हजारो शिक्षकांच्या नियुक्‍त्या या आर्थिक व्यवहार करुन केल्या जातात. आजही अनेक शाळांमध्ये अप्रशिक्षित शिक्षक शिकवतात, आजही अनेक प्रशिक्षित शिक्षक पाच ते दहा हजार महिना पगारावर काम करतात.

शासकीय पगार असणारे शिक्षक आणि पाच ते दहा हजारांवर काम करणारे शिक्षक ही दरी दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. पूर्वी खासगी मराठी शाळांमध्ये जो प्रकार चालायचा, तो आता खासगी इंग्रजी शाळांमध्ये चालतो आहे. ही दरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या या प्रश्‍नावर मोठ्या प्रमाणात लक्ष वेधण्याची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)