‘शिक्षक दिन’ का साजरा केला जातो?

पाच सप्टेंबर या दिवसाचे एक विशेष महत्त्व आहे. पाच सप्टेंबर हा दिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.  शिक्षक, गुरू यांचे आपल्या जीवनात मोठे महत्व आहे. जगभरात ५ ऑक्टोबरला साजरा केला जाणारा शिक्षक दिन आपल्याकडे ५ सप्टेंबरलाच साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस. डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले. शिवाय त्यांचीही तशी इच्छा होती.

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रासजवळील तिरुराणी येथे झाला. ते ब्राम्हण कुळातले असल्याने घरात धार्मिक वातावरण होते. अवघ्या १५ व्या वर्षी मॅट्रिक पास करत त्यांनी तत्वज्ञान या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी ‘वेदांतातील नीतिशास्त्र’ या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या या प्रबंधास विद्यापीठाने सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर करून त्यांचा गौरव केला.

एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून  डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या कार्यातून स्वतःची साऱ्या जगाला ओळख करून दिली. कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व यामुळे साता समुद्रापारही त्यांची कीर्ती झाली. शिवाय ऑक्सफर्ड विद्यापीठातही डॉ. राधाकृष्णन नीतिशास्त्राचे प्राध्यापक होते. तेथून परत आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या उपाधींनी गौरविण्यात आले. ते काही काळ बनारस विश्व हिंदू विद्यापीठाचे उपकुलगुरू होते. या काळात त्यांनी विद्यापीठाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले.

डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षकी जीवनबरोबरच राजकारणातही आपली छाप पाडली. १३ मे १९५२ रोजी ते देशाचे पहिले उपराष्ट्रपती बनले. व १३ मे १९६२ मध्ये दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. राष्ट्रपती पदाची शपथ घेताना त्यांचा जन्मदिन हा शिक्षकांचा गौरव दिवस म्हणून साजरा केला जावा, अशी इच्छा त्यांनी जवाहरलाल नेहरूंकडे बोलून दाखवली. त्यांनीही ती तात्काळ मान्य  करत ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्याचा शासन आदेश काढला. शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे डॉ. राधाकृष्णन म्हणत असे.

शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमुल्यन केला जात असल्याचे चित्र समाजात दिसत आहे. तसेच गुरू-शिष्य संबंधांमधील पवित्र भावना लोप पावत आहे. या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्‍यासाठी व डॉ. राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
8 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)