शिक्षक दिनानिमित्त ह्रतिक रोशनने आपल्या आगामी चित्रपट ‘सुपर-३०’चा नवे पोस्टर लॉन्च केले आहे. या चित्रपटात ह्रतिक एका शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असून या नव्या पोस्टरवर त्याने शिक्षकांसाठी खास मेसेजही लिहिला आहे. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा… अब राजा वही बनेगा जो हकदार होगा!’ अशी टॅगलाईन पोस्टरवर देण्यात आली आहे.

सुपर-३० हा चित्रपट आनंद कुमार यांच्यावर आधारित आहेत.  दरवर्षी आनंद कुमार ३० गरीब विद्यार्थ्यांना मोफत आयआयटीचे प्रशिक्षण देतात. हे सर्व विद्यार्थी आयआयटीमध्ये सिलेक्ट होतात. आनंद कुमार यांच्या भूमिकेत ह्रतिक रोशन आणि त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत मृणाल ठाकूर दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करणार आहेत. पुढील वर्षी २५ जानेवारी रोजी सुपर-३० हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)