शिक्षक दिनानिमित्त गुगलचे खास डूडल 

शिक्षक दिनाच्या निमित्त गुगलने आज एक खास डूडल बनविले आहे. या डूडलद्वारे गुगलने भारतातल्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या डूडलमध्ये मधोमध एक पृथ्वी असून तिच्या डोळ्यांवर चष्मा बनविला आहे. सोबतच पृथ्वीच्या अवतीभोवती वेगवेगळ्या विषयांची चिन्हे रेखाटण्यात आली आहेत. यामध्ये खेळ, संगीत, केमिस्ट्री, भूगोल, आर्ट अँड क्राफ्ट आदी चिन्हे दिसत आहेत. या डूडलवर क्लिक करताच एका टॅबमध्ये शिक्षक दिनानिमित्ताची सर्व वृत्त, लेख आदी ओपन होतात.
संपूर्ण भारतात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आशीर्वाद घेण्यात येतात. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असतो. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राधाकृष्णन यांचे भारताच्या शिक्षण व्यवस्थेत उल्लेखनीय योगदान आहे. ते एक उत्तम शिक्षक व राजकारणी होते. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ शिक्षक दिन त्यांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येतो. दरम्यान, जगभरात मात्र ५ ऑक्टोबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)