शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! (प्रभात Open House)

आज शिक्षक दिन. देशाचे पूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्म दिवस. राधाकृष्णन हे नेहमी त्यांच्या अनुयानांना सांगत कि जर समाजपरिवर्तन करण्याची ताकद जर कोणात असेल तर ती फक्त एका सामान्य शिक्षकाकडे आहे. त्यामुळे शिक्षक हा समाजाचा खूप मोठा कणा आहे , हे वेळोवेळी सिद्ध झालेच आहे. तर जाणून घेउयात  शिक्षकदिनाचे महत्व.

तुम्ही किती अंतर चालून गेलात हा कमी महत्वाचा प्रश्न आहे पण तुम्ही कोणत्या दिशेने वाटचाल करत आहात ती दिशा फार महत्वाची असते. माणूस जीवन तर जगतच असतो पण जीवनाला / आयुष्याला योग्य दिशा देण्याचं काम शिक्षक करतात. आई वडिलांनी जन्म देऊन हे सुंदर जग दाखवलं खरं, पण या जगात कसं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं हे सर्व शिकवण्याचं काम शिक्षक करतात. आपला विद्यार्थी कितीही अडचणीत असला तरी त्याला सर्वोतोपरी मदत करण्याचं काम शिक्षक करतात.  त्यांनी  दिलेली ज्ञानाची शिदोरी ही आयुष्यभर पुरुन उरते. त्यांचे उपकार हे कधीही न फेडण्याजोगे असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एक माणूस घडवण्यासाठी स्वतः चं आयुष्य पणाला लावणारा दुसरा माणूस म्हणजे शिक्षक. त्यांनी मार्गदर्शनाच्या माध्यमातून पेटवलेल्या संस्काराच्या ज्योतीनेच आमच्या आयुष्यात यशाचा उजेड पडतो हे मात्र नक्की. अशाच माझ्या आयुष्यात आलेल्या ज्ञात-अज्ञात सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा…..

– आनंद मसलखांब, सोलापूर ( MA  HISTORY )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)