शिक्षक आपल्या दारी’ चैतन्य विद्यालयाचा उपक्रम

ओतूर- ग्राम विकास मंडळ ओतूर (ता. जुन्नर) संचलित चैतन्य विद्यालयाने “शिक्षक आपल्या दारी’ ही योजना राबवून विद्यार्थी आणि पालकांबरोबर संवाद साधला आहे. पाच दिवसांत विद्यालयातील दहावीच्या 300 विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून त्यांच्या पाल्यांचा प्रथम सत्र परीक्षेतील गुणांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने काय प्रयत्न करता येईल यावर चर्चा केली, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली. विद्यालयात दहावीच्या परीक्षेस बसलेले अनेक विद्यार्थी आदिवासी, दुर्गम भागातून, वाड्या-वस्त्यांमधून येतात. या विद्यार्थ्यांचे पालक आदिवासी, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी आहेत. त्यांना शाळेत येऊन आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आढावा घेणे शक्‍य होत नाही, त्यामुळे अशा पालकांना पाल्याची शालेय प्रगती कळावी तसेच पाल्य व पालकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी शिक्षक विद्यार्थ्याच्या दारी जाऊन शिक्षक- पालक- बालक अशा प्रकारची बैठक घेऊन शैक्षणिक प्रगती संदर्भात चर्चा करतात. हा उपक्रम सलग 16 वर्षे चालू आहे. या उपक्रमासाठी शिक्षकांची तीन पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात दहा शिक्षकांचा समावेश करण्यात आला होता. रोज रात्री 7 ते 11 या दरम्यान 15 पालक सभा झाल्या. या पथकांसाठी गट समन्वयक म्हणून ब्रह्मदेव घोडके, भाऊसाहेब खाडे, प्रतिक अकोलकर यांनी काम पाहिले. या पथकांनी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे, संजय ढमढेरे, बबन डुंबरे, प्रदिप गाढवे, पंकज घोलप, संतोष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काम केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)