शिक्षकांप्रती आदर हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण

अण्णापूर- आपल्या आयुष्याला वळण लावणाऱ्या या शिक्षकांप्रती सर्वांनी आदर बाळगलाच पाहिजे. किंबहुना शिक्षकांप्रती आदर हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण होय, असे मत शिरुर तालुका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष अंबादास कुरंदळे यांनी व्यक्त केले.
अण्णापूर (ता.शिरुर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या शासनाच्या आदेशानुसार मे महिन्यात बदल्या झाल्या होत्या. त्यांच्या निरोप आणि सत्कार समारंभाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती आणि अण्णापूर ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुरंदळे बोलत होते.
बदल्या झालेल्या शिक्षकांना परत आपल्या शाळेत आलेले पाहून विद्यार्थ्यांना आनंद झाला. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी एकच गर्दी केली. यावेळी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विविध भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी काही शिक्षकही भावनाविवश झाले तर, काही शिक्षकांच्या आठवणीने विद्यार्थीही गहिवरले.
यावेळी विद्यार्थीप्रिय तंत्रस्नेही शिक्षिका सुरेखा पवार यांनी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्याकडून शिकायला मिळाल्याचे सांगितले. याच कार्यक्रमात शिष्यवृत्ती मार्गदर्शक बाळासाहेब डांगे, दादाभाऊ वाघमारे, शितल थोरात, प्रिया काळे या बदली झालेल्या शिक्षकांनीही शाळेतील आठवणींना मनोगतातून उजाळा दिला.
यावेळी माजी मुख्याध्यापक आनंदा रासकर, पत्रकार रवि खुडे यांनी या शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांना नवीन शाळेवर चांगले काम करण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. या निरोप समारंभ कार्यक्रमात सुरेखा पवार, संजया मांडगे, प्रिया काळे, शितल थोरात, मंगल शिंदे , रोहिणी चव्हाण, बाळासाहेब डांगे, दादाभाऊ वाघमारे या शिक्षकांना निरोप देण्यात आला. तर मुख्याध्यापक भाऊसाहेब गवळी, शिवाजीराव वाळके, सुनंदा पवार, छाया मोरे, स्मिता ससाणे, राधिका थोरात, बाळासाहेब चकोर, जनाबाई शेळके या नव्याने आलेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य दादा पाटील घावटे, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष अंबादास कुरंदळे, शिरुर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती विठ्ठल पवार, अण्णापूरचे सरपंच दत्तात्रय कुरंदळे, उपसरपंच रवि झंजाड, ग्रामपंचायत सदस्य पप्पू पवार, महेश कुरंदळे, कविता झंजाड, मंगल रासकर, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गौतम कुरंदळे, पांडुरंग कुरंदळे, उपाध्यक्ष रामदास शेळके, युवा कार्यकर्ते राजेंद्र घावटे, मेजर नामदेव शिंदे, माजी चेअरमन मारुती कुरंदळे, पत्रकार रवि खुडे, आनंदा रासकर यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि आजी माजी विद्यार्थी उपस्थित हौते.
यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब गवळी यांनी तर, सूत्रसंचालन अखिल पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव वाळके यांनी केले. बाळासाहेब चकोर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)