शिक्षकांनों आता ‘समग्र’ डेटा एन्ट्री ऑपरेटर व्हा

25 एप्रिलपर्यंतची मुदत: सर्व शैक्षणिक योजना समग्र या योजनेत समाविष्ट होणार

पुणे – पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अभियान ही एकच योजना सुरु करण्यात आली असून या योजनेसाठी लागणारी माहिती ऑनलाईन प्रणालीमध्ये 25 एप्रिलच्या आत भरण्याच्या सूचना शिक्षकांना करण्यात आल्या आहे. त्यामुळे मागील वर्षीपासून शिक्षकांच्या मागचे सरल प्रणालीचे दुखणे अजून कुठे संपते ना संपते तर आता आणखी एक डेटा भरण्यासाठी शिक्षकांना कामाला लावले जात आहे.

सारखं ऑनलाईन ऑनलाईन करणाऱ्या शिक्षण विभागाने नेमकं चालवलय तरी काय? एकीकडे परीक्षा, निकाल, नव्या अभ्यासक्रमाची प्रशिक्षणे करायची की यांची माहिती भरत बसायची? 12 एप्रिल रोजी पत्र काढून 13 दिवसांत राज्यातील सर्व शिक्षकांना हा डेटा भरायला सांगितला जातो. ही माहिती शिक्षकांपर्यंत पोहचण्यासच पुढचे काही दिवस जातील मग शिक्षकांनी इतक्‍या कमी कालावधीत माहिती भरायची कशी?
प्रशांत रेडिज, मुख्याध्यापक व प्रवक्‍ता
महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघ

केंद्र सरकारने शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, शिक्षक शिक्षण या योजनांचे एकत्रिकरण करण्याचे ठरविले असून यामधून सर्वांसाठी समग्र अशी एकच योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेशी संबंधित विद्यार्थ्यांच्या गणवेश, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, डिजिटल शिक्षण याविषयक आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीच शिक्षण विभागाने प्रत्येक राज्यांकडून त्यांच्याकडील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती स्टुडंट डेटाबेस मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम (एसडीएमआयएस) या प्रणातून माहिती भरुन घेण्यास सांगितले आहे. आतापर्यंत राज्यात सरलची जी माहिती भरण्यात आली आहे ती सर्व माहिती या एसडीएमआयएस प्रणालीला जोडली आहे. मात्र त्या व्यतिरिक्‍त ज्या माहितीची नव्याने गरज आहे ती माहिती शिक्षण विभागाने आता शिक्षकांना भरण्याचे आदेश दिले आहेत. ही सर्व माहिती राज्य शासनाला केंद्राला देणे बंधनकारक असून ही माहिती 1 मे च्या आत देण्याची मुदत आहे. त्यामुळेच शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी ही माहिती 25 एप्रिलपर्यंत भरुन घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

मग परीक्षा व निकालाचे काम कधी करायचे?
दरम्यान सध्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा घेण्याचे काम सर्वत्र सुरु आहे. त्यानंतर लगेचच शिक्षकांना विद्यार्थ्यांचे निकाल घेण्यासही सांगिलेले आहे. या वर्षीपासून नववीच्या फेरपरीक्षांचेही आयोजन करण्यास सांगितले आहे. तसेच विद्या प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या चाचण्याही शाळांनीच घ्याव्यात अशाही सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. त्यातच आता ही डेटा भरण्याचीही भर पडली असल्याने राज्यातील शिक्षक आम्ही डेटा एन्ट्री ऑपरेटर आहोत का, असा प्रश्‍न उपस्थित करत आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

2 COMMENTS

 1. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाचे नाव सांगून ही भामटेगिरी (उचलठेव) बंद करावी.
  सरल अजुन पर्यन्त 100% कार्य हॉट नाही.
  1) मागील 3 वर्षापासून संच मान्यता दुरुस्ती नाही.
  2) दरवर्षी संचमान्यता सत्र संपल्यानंतर मिळत आहे. यावर्षी जानेवारी मध्ये विद्यार्थी व शाळा माहिती सरल प्रणालित ऑनलाइन केल्यानंतरही अजून संच मान्यता तयार नाही.
  3) महाराष्ट्र शैक्षणिक दृष्टया प्रगत आशा पद्धतीने वेगवेगळ्या माहिती मागून कशी साध्य होणार. सरल, यू डायस व आता ही माहिती.
  4) प्रत्येक ठिकाणी एकसारखी माहिती ऑनलाइन करणे शिक्षकांचा महत्वाचा वेळ वाया घलनेच होय.
  5) शिक्षकांकडून चांगले अध्ययन व अध्यापन कार्य व्हावे यासाठी दीर्घकालीन व स्थिर उपाय योजिले पाहिजे.
  6) सद्या शिक्षण विभाग सर्व अधिकारी, पदाधिकारी व विभाग यांसाठी प्रयोगशाळा व निमुटपणे कामं करणारी संस्था झाली आहे.
  7) होणाऱ्या अपायांपासून शिक्षण क्षेत्र योग्य निर्णय व त्याची अंमलबजावणी करून वाचवावे.
  हीच नम्र विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)