शिक्षकांनी लोकसहभागातून मिळवले साडे चारकोटी

संग्रहित छायाचित्र....

गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे : खेड तालुक्‍याचा जिल्ह्यात आदर्श

आंबेठाण- खेड तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी पंचायत समिती खेडच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना प्रेरीत केले. शिक्षक समाजात गेला पाहिजे व समाज शाळेत आला पाहिजे. या सामाजिक बांधीलकीतून सामाजिक संस्था, ग्रामस्थ, स्थानिक संस्था व स्वतः शिक्षकांनी हातभार लाऊन साडेचार कोटी लोकसहभाग तालुक्‍याला प्राप्त केला आहे. शिक्षकांनी स्वतः किमान 2000 ते कमाल 10 हजार प्रति शिक्षक, असे एकूण 32 लाख निधी शाळांना दिला आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

खेड तालुक्‍यातील सर्व शिक्षकांनी माजी विद्यार्थी मेळावा, स्नेहसंमेलन, मातापालक संघ, सामाजिक संस्था, कंपन्या व स्वतः शिक्षकांनी प्रयत्न करून बोलका व्हरांडा, स्मार्ट टीव्ही, प्रिंटर, टॅब, अभ्यासिका, स्पीकर, सौर उर्जा, संगणक लॅब, खेळाचे साहित्य, ग्रंथालय, पिण्याचे पाणी, संरक्षक भिंत, इंग्रजी उपक्रम, शिष्यवृत्ती, क्रीडा स्पर्धा, शिक्षक स्पर्धा, पुस्तके, गणवेश, सांस्कृतिक कला मंच, परिसर सुशोभीकरण, किरकोळ दुरुस्ती, नवीन वर्गखोल्या या सारख्या शैक्षणिक व भौतिक गुणवत्तेसाठी 402 शाळांमधील 1570 शिक्षकांनी एक शैक्षणिक चळवळ सुरु केली. यामुळे तालुक्‍यात शिक्षकांबद्दल आदर निर्माण झाला आहे. यावर्षी झालेल्या क्रीडा महोत्सवात तालुक्‍याला चॅम्पियनशीप मिळाली. 100 इ लर्निंग, स्मार्ट टीव्ही असणारा तालुका म्हणून तालुक्‍याची ओळख निर्माण झाली. 150 शाळांमध्ये टॅबमार्फत शिक्षण दिले जाते. इंग्रजी उपक्रम, शिक्षक स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, दप्तरविना शाळा यामुळे विध्यार्थी व शिक्षक यांच्या कलागुणांना संधी निर्माण झाली आहे. पर्यायाने जि.प. शाळांचा दर्जा वाढत चालला आहे.जिल्हा परिषद शाळांचा पट वाढल्याने 28 जादा शिक्षक मंजूर झाले आहेत.

  • लाखमोलाचा निधी
    मिळवलेला निधी पुढीलप्रमाणे – नवीन वर्गखोल्या (70 लाख), सांस्कृतिक कार्यक्रम (21 लाख), संगणक प्रिंटर (40 लाख), फर्निचर (5 लाख), सुशोभिकरण (3 लाख), पिण्याचे पाणी (8 लाख), गणवेश/पुस्तके/इतर (50 लाख), स्मार्ट टी.व्ही (35 लाख), शिक्षक मदत (32 लाख), टॅब (30 लाख), सौरउर्जा (6 लाख), स्वच्छतागृहे (40 लाख), स्टेज/कमान (6 लाख), स्पीकर (3 लाख), खेळाचे साहित्य (5 लाख), बोलका व्हरांडा (6 लाख), विविध स्पर्धा (8 लाख), संगणक लॅब (7 लाख), अभ्यासिका (2 लाख), गणित /विज्ञान साहित्य (3 लाख).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)