शिक्षकांनी केलेली मर्यादित शिक्षा अपराध नाही (भाग-२)

शिक्षकांनी केलेली मर्यादित शिक्षा अपराध नाही (भाग-१)

केरळ उच्च न्यायालयाच्या अब्दुल वहीद विरुद्ध केरळ राज्य 2005 (2)के एल टी 72, एम नाटेसन विरुद्ध मद्रास राज्य व ईतर व आय आर 1962 एम ए डी 216, गणेश चंद्र साहा विरुद्ध जिवराज सोमानी ए आय आर 1985 सी ए एल 32 ई खटल्यातून उच्च न्यायालयानी शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते वैशिष्ट्य्‌पूर्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामधे जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला प्रमाणाबाहेर शिक्षा केली जाते व ह शिक्षा ईजा करण्याच्या उद्देशाने केली असेल तेव्हाच तो शिक्षक अपराधाच्या कक्षेत येतो असे सांगितले आहे. सरकारी वकिलानी युक्‍तिवाद करताना लहान मुलाला शारीरिक दंडाची शिक्षा शिक्षकाला करण्याची परवानगी नाही असे स्पष्ट केले. मात्र खंडपीठाने निकाल देताना स्पष्ट केले की सदर घटना 5/11/2015 ला घडली व त्याच दिवशी तिची तपासणी केली. व डॉक्‍टरांनी त्याचा अहवाल 29/3/2016 ला दिला आहे. वैद्यकीय अहवाल पाहता त्या मुलीला बाह्यरुग्ण म्हणून तपासले व त्याच दिवशी तिला सोडण्यात आले व त्यावेळी तिची तब्येत चांगली होती हे स्पष्ट आहे, त्यामुळे जर भा द वि कलम 323 सिद्ध करायचे असेल तर एखाद्या व्यक्‍तीला झालेली शारीरिक ईजा विशिष्ट उद्देशाने केलेली असणे आवश्‍यक आहे. तसेच त्यामुळे त्याचा परिणाम गंभीर दुखापतीमधे होणार असला पाहीजे. अशीच ईजा असल्यास कलम 323 लावता येईल. तसेच बाल गुन्हेगार प्रतिबंधक व संरक्षण कायदा 2000 साठी विनाकारण एखाद्या व्यक्‍तीच्या ताब्यातील मुलाला जबरदस्त मारहाण केली त्याला अपमानास्पदरित्या वागणूक दिली व शारीरिक ईजा केली तरच हे कलम लागू होते असे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकूणच विद्यार्थ्याना शिक्षा केली म्हणून सरसकट शिक्षकाना अपराधाच्या गुन्ह्यामधे अडकवता येणार नाही त्याची गंभीरता तपासूनच गुन्हा दाखल करावा या आदेशासह उच्च न्यायालयाने त्या शिक्षकाविरुद्धचा गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला आहे.

या निकालामुळे प्रामाणिक शिक्षकाने विद्यार्थ्याला किरकोळ शिक्षा दिली तरी गुन्हा दाखल होण्याची भीती कमी होणार आहे. गंभीर शिक्षा नसताना विनाकारण न्यायालयीन खटल्यात अडकवण्यावर परिणाम होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)