शिक्षकांनी केलेली मर्यादित शिक्षा अपराध नाही (भाग-१)

शिक्षकानी विद्यार्थ्याला केलेली शिक्षा सरसकट फौजदारी अथवा बाल गुन्हेगार प्रतिबंधक व सरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नाही. विद्यार्थ्याला शिक्षा करण्याचा अधिकार फक्त शिक्षकानाच नसून स्थायी अथवा अस्थायी पालकाना देखील आहे. त्यामुळे न्यायालयानी देखील शिक्षेचे गांभीर्य समजूनच खटला दाखल करून घेणे गरजेचे आहे, असे मत केरळ उच्च न्यायालयाने एका याचिकेत स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निर्देशाप्रमाणे विनाकारण एखाद्याला फौजदारी खटल्यात गुंतवणे व मानसिक त्रास देणे गंभीर बाब असल्याचे नमूद करीत याचिकाकर्त्यावर दाखल गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला आहे.

राजन उर्फ राजू विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक फेरोक पोलीस स्टेशन, एर्नाकुलम व ईतर या खटल्यात न्या. राजा विजय राघवन यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्व पोलीस व पालकाना मार्गदर्शक असा हा निकाल आहे. राजन उर्फ राजू या शिक्षकाने केरळ उच्च न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 482 नुसार ही याचिका दाखल केला होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदर याचिकाकर्त्यावर दुसरीतील विद्यार्थिनीला गणीत शिकवताना वजाबाकी करताना झालेल्या चुकीबद्दल तिच्या खांद्यावर धक्‍का मारला म्हणून तिच्या पालकानी त्या शिक्षकाविरुद्ध भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम 23 व बाल गुन्हेगारी प्रतिबंधक व सरक्षण कायदा 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करणेत आला होता.

शिक्षकांनी केलेली मर्यादित शिक्षा अपराध नाही (भाग-२)

सदर मुलीला या शिक्षकाने हाताच्या मुठीने खांद्याला धक्‍का मारला होता. संध्याकाळी हात दुखत असल्याने तिने आई-वडिलांना सांगितले. त्यावर चौकशी करून तिच्या वडिलानी सदर शिक्षकावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे याचिकाकर्ते शिक्षक यानी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पोलीस उपनिरीक्षक, राज्य सरकार व त्या पालकाच्या विरुद्ध याचिका दाखल केली. याचिककर्त्याच्या वकिलानी युक्‍तिवादात स्पष्ट केले की जरी शिक्षकाने शिक्षा केली असे मान्य केले, तरी त्या शिक्षकाने कुठेही उसाच्या कांडीने अथवा एखाद्या हत्याराने तिला मारले नाही. त्यामुळे ते गंभीर जखमेच्या दृष्टीने मारले नसल्याचे सिद्ध होत आहे. फक्‍त खांद्याला हाताच्या मुठीने धक्‍का मारणे म्हणजे द्वेष केला नाही शिक्षकाने केलेली शिक्षा ही सदहेतूने केली असून विद्यार्थ्याच्या हितासाठी केली आहे असे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)