शिक्षकांना न्याय मिळणार का?

प्रशासनाकडून मनमानी कारभार सुरू; तिसऱ्या दिवशीही हक्‍कासाठी लढा

पुणे – आंतरजिल्हा बदलीने आलेल्या अनुसुचीत जमातीच्या शिक्षकांना अद्याप पदस्थापना देण्यात आली नाही. त्यामुळे तिसरा दिवसही शिक्षकांना स्वत:च्या हक्‍काचा लढा देण्यात गेला. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून न्याय मिळाला नाही. दरम्यान, या शिक्षकांनी एकजुटीने शिक्षण विभागाच्या प्रक्रियेला विरोध करत विभागीय आयुक्‍तांची भेट घेऊन पेसा कायद्यानुसार अनुसूचीत जमातीच्या शिक्षकांना पेसा कार्यक्षेत्रात पदस्थापना मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामविकास विभागाकडून झालेल्या ऑनलाईन बदली प्रकरणातील विस्थापीत शिक्षक आणि खोटे कागदपत्रे सादर करून बदली मिळवणाऱ्या शिक्षकांचा तिढा सुटता सुटेना. तोच दुसरीकडे विविध जिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या शिक्षकांचा तिढा, शिक्षण विभागाच्या भोंगळ्या कारभारामुळे आणखीन वाढत चालला आहे. या बदलीप्रकरणात शिक्षण विभागातील कारभाराबाबत दबक्‍या आवाजात तक्रारी केल्या जात आहे. त्यामुळे अनुसूचीत जमातीच्या शिक्षकांना न्यायापासून दूर रहावे लागत आहे. दरम्यान, पेसा कायद्याच्या तरतुदी पाहता पेसा कार्यक्षेत्रातील शाळेवर कार्यरत असणाऱ्या बिगर अदिवासी शिक्षकांचे समायोजन बिगर अदिवासी क्षेत्रातील शाळेत प्रत्येक शैक्षणिक वर्षात 20 टक्‍के प्रमाणे पदे रिक्‍त करून, या शिक्षकांना सामावून घेण्याचा शासन निर्णय आहे.

असे असतानाही शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता अंतर जिल्हा बदलीने हजर झालेल्या अनुसूचीत जमातीच्या शिक्षकांवर अन्याय करून त्यांच्या इच्छेविरुद्ध बिगर अदिवासी क्षेत्रात पदस्थापना देण्यात येत आहे. ही प्रक्रिया असंविधानिक असून, ती रद्द करण्यात यावी आणि पेसा कार्यक्षेत्रातील पदे पेसा कायद्यानुसार 20 टक्‍के प्रमाणात रिक्‍त करून पुणे जिल्हा परिषद येथे हजर झालेल्या अनुसूचीत जमाती शिक्षकांना पेसा कार्यक्षेत्रातील शाळेवर पदस्थापना देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रीय रोस्टर, हक्‍क, अधिकार, न्याय संघटनेकडून करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संदीप फणसे यांनी सांगितले.

महिलांना दुर्गम भागात पदस्थापना?
जिल्ह्यात मोठा प्रमाणात जागा रिक्‍त असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून जाणीवपूर्वक जेवढे शिक्षक तेवढ्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील शाळा आहेत. एवढच नव्हे तर महिला शिक्षकांची दुर्गम भागात बदली देऊ नये, असा शासनाचा आदेश असतानाही शिक्षण विभागाकडून महिलांना दुर्गम भागात पाठविले जात आहे. पदस्थापना द्यायची असेल, तर समायोजनेने द्यावेत. एकावर न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय असे न करता, पेसा कायद्यानुसार शिक्षकांना पदस्थापना द्यावी, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)