शिक्षकांना घडविणाऱ्या शिक्षकाचा सन्मान

लोखंडे यांना आदर्श पुरस्कार; नवनवीन अध्ययन पद्धतीचा अभ्यास
प्रकाश चिखले

कोल्हारखुर्द – शिक्षक चतुरस्त्र असावा लागतो. त्याला गतिमानतेचे भान असावे लागते. गळनिंब येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अनिल लोखंडे त्या कसोटीला उतरले आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवित असतो. त्याचे ते कामच असते; परंतु “शहाणे करून सोडावे सकलजन’ या उक्तीप्रमाणे लोखंडे यांनी आपल्याला मिळालेले ज्ञान इतरांनाही दिले. मुख्याध्यापक व शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण दिले. त्यांच्या विज्ञान व गणितातील कामगिरीची दखल राज्य सरकारने घेतली. त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला असून आज त्याचे सातारा येथे वितरण होत आहे.
लोखंडे हे प्रवरा माध्यमिक विद्यालयात नववी-दहावीच्या वर्गाला शिकवितात. महाराष्ट्र विज्ञान प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या कृतीयुक्त भूमिती या उपक्रमाबाबत लोखंडे यांनी नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिंगापूर येथे जाऊन त्यांनी नवनवीन अध्यापन पद्धतीचा अभ्यास केला. कृतीवर आधारित शिक्षण आणि ज्ञानरचनावादाचे धडे त्यांनी गिरविले. ते विद्यार्थ्यांना शिकविले. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला. केंद्र सरकारच्या सीसीआरटी या उपक्रमात उदयपूर (राजस्थान) येथे लोखंडे यांनी 11 दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना करून दिला. सांस्कृतिक वैविधतेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा कौशल्यावर आधारित व्यवसाय व मार्गदर्शन प्रशिक्षण त्यांनी घेतले.
सरकारी सर्वंच शाळांना दिले जातात; परंतु ते पूर्ण केले जातातच असे नाही. लोखंडे यांनी मात्र सरकारी शैक्षणिक प्रकल्पांचा अभ्यास करून ते सर्वंत्र राबविले. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. नववी-दहावीच्या अविरत प्रशिक्षकपदासाठी त्यांची निवड झाली. त्यांनी 132 मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षण दिले. शिक्षणात ऑनलाईन पद्धत आणली. जलदगतीने शिक्षण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी राबविला. प्रगत अध्ययन पद्धती त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोचविली. शाळेचे आणि परिसराचे नाव त्यांनी राज्यपातळीपर्यंत नेले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)