शिक्षकांनाही “धन्वंतरी’चा लाभ!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिक्षकांना अखेर धन्वंतरी योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजूर केला आहे. गेल्या 25 वर्षांपासून शिक्षकांची ही मागणी मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. विशेष म्हणजे, सेवानिवृत्त शिक्षकांनाही या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.

भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात 14 ऑक्‍टोबर 2018 रोजी शिक्षक मेळावा घेतला. त्यावेळी शहरातील शासकीय आणि निमशासकीय तसेच खासगी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यावेळी संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार महेश लांडगे यांना “धन्वंतरी’ योजना लागू करण्याबाबत सांकडे घातले होते. महापालिका प्रशासनाकडे प्रलंबित असलेला हा विषय लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, असे आश्वासन आमदार लांडगे यांनी शिक्षकांना दिले होते.

-Ads-

दरम्यान, आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. महापालिकेच्या शाळांमधील सेवेतील, तसेच सेवानिवृत्त शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय उपचारांसाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना लागू करण्याची शिफारस प्रशासनाकडे करण्यात आली.

पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व कर्मचा-यांना धन्वंतरी योजना लागू केली होती. मात्र, शिक्षकांना या योजनेतून वगळण्यात आले होते. सुमारे 1100 शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे शिक्षकांना आरोग्य वीमा योजनेचे सर्व फायदे मिळणार आहेत, अशी माहिती पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव हरिष चौधरी यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)