शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू

पिंपरी – माध्यमिक शाळेतील अतिरिक्‍त शिक्षकांची माहिती, आरक्षण, विषय आणि वर्गांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून सन 2017-18 च्या संचमान्यतेनुसार राज्यात 645 शिक्षक अतिरिक्‍त ठरले आहेत. या सर्वांच्या समायोजनाची प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

राज्याच्या शिक्षण विभागातर्फे शासकीय समायोजन पोर्टलवर माध्यमिक शाळांना अतिरिक्‍त शिक्षकांच्या माहितीसह, रिक्‍त पदे, आरक्षण, विषयांची माहिती टाकण्यास सांगितले होते. त्यानुसार राज्यातील माध्यमिक शाळांनी ही माहिती समायोजन पोर्टलवर भरली. सन 2017-18 च्या संचमान्यतेनुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिरिक्‍त ठरलेल्या शिक्षकांची पडताळणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली. माध्यमिक शाळांमधील एकूण 645 शिक्षक अतिरिक्‍त ठरले असून 1206 पदे रिक्‍त आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अतिरिक्‍त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सध्या सुरू आहेत. विशेष म्हणजे अतिरिक्‍त शिक्षकांचे ऑन दी स्पॉट समायोजन करण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्‍त शिक्षकांची संख्या कमी आहे, त्या ठिकाणी रिक्‍त जागांवर शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्‍त शिक्षकांची संख्या पन्नासच्या वर आहे, त्या जिल्ह्यात समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये संचमान्यतेची पडताळणी करताना, वाढीव पदे आढळून आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)