शिक्रापूर- शाळेमध्ये मुले घडविण्यामागे शिक्षकांचे कष्ट आणि योगदान महत्वाचे असून त्यांच्यामुळे मुले वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जातात, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे यांनी केले.
गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथील पद्मावतीवस्ती जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शाळेतील शिक्षक अमोल वारघडे यांच्या सेवापूर्ती बद्दल वारघडे यांचा सन्मान पद्मावतीवस्ती ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केला होता. यावेळी केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रप्रमुख तिरसिंग धुमाळ हे होते. याप्रसंगी गणेगाव खालसाचे उपसरपंच दत्तात्रय पिंगळे, माजी केंद्रप्रमुख तिरसिंग धुमाळ, राष्ट्रपती पारितोषिक विजेते अनिल पलांडे, माजी सरपंच नरसिंग धुमाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक धुमाळ, सिनेकलाकार श्रीकांत धुमाळ, रुपेश बोरुडे, माजी उपसरपंच पांडुरंग गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य जयवंत सुरसे, आबासाहेब गोरडे, पूजा धुमाळ, सुरेखा नवगिरे, संजय सुरसे, अनिल भोसले, पोपट मोरे, सुनील शेळके, राहुल चातुर यांसह आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रणव सुभाष धुमाळ, वैष्णवी आण्णासाहेब धुमाळ, जय रोहिदास धुमाळ, सार्थक संजय सुरसे, हर्षदा सुनील नवगिरे, ओम सतीश धुमाळ, श्रुतिका आण्णासाहेब धुमाळ यांचा ग्रामस्थांच्या वतीने स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच यावेळी सेवापूर्ती झालेले शिक्षक अमोल वारघडे यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल मनोगत व्यक्त केले. तर सेवापूर्ती निमित्त करण्यात आलेल्या सन्मानाला उत्तर देताना शिक्षक अमोल वारघडे यांसह विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित पालकांना गहिवरून आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष गावडे यांनी केले. तर मुख्याध्यापक सतीश खेडकर यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ पवार यांनी आभार मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा