शिक्षकांच्या नोकरीवर येणार गंडांतर

पुणे – अकरावी प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तब्बल 165 कनिष्ठ महाविद्यालयात शून्य ते 20 टक्‍क्‍यांच्या दरम्यान प्रवेश झाले आहेत. त्यामुळे अकरावीच्या 165 तुकड्या प्रवेशअभावी अडचणीत येणार आहेत. प्रवेशच कमी झाल्याने या तुकडी बंद होतील आणि येथील शिक्षकांच्या नोकरीवर गंडातर येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

अकरावीच्या प्रवेशाची आकडेवारी शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले. त्यात तुकडी व कॉलेजनिहाय प्रवेशाची संख्याही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्या महाविद्यालयात किती प्रवेश झाले आहेत, त्याची माहिती समोर आली आहे. त्यात शून्य ते शंभर टक्‍के प्रवेश झालेल्या महाविद्यालयांची नावेही नमूद आहेत. विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी अतिरिक्‍त फेरी घेऊनही 30 हजार प्रवेश रिक्‍त राहिले आहेत.

दरम्यान, तुकडीनिहाय अकरावीच्या एकूण प्रवेश क्षमतेपैकी 20 पेक्षा कमी प्रवेश झाले असतील, ती तुकडी बंद होतील. त्यामुळे सध्या तरी 165 तुकड्यांमध्ये शून्य ते 20 टक्‍क्‍यांच्या आसपास प्रवेश झाले आहेत. त्यामुळे ही सर्व तुकडी शिक्षण विभागाला बंद करावे लागतील. त्यातील धक्‍कादायक बाब म्हणजे 25 तुकडी हे अनुदानित आहेत. उर्वरित तुकडी कायमस्वरुपी विनाअनुदानित तत्वावरील आहेत. अनुदानित तुकडीवरील शिक्षकांना अन्य महाविद्यालयात रिक्‍त जागेवर समायोजन केले जातील. मात्र कायम विनाअनुदनित तत्वावरील तुकड्यांवरील शिक्षकांच्या नोकरीवर संक्रात कोसळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

महाविद्यालयाची संचमान्यता होत असताना विद्यार्थी संख्येवर शिक्षकांचे प्रमाण निश्‍चित केले जाते. विद्यार्थी संख्या 20 पेक्षा कमी असेल, तर तेथील शिक्षकांना मान्यता मिळणार नाही. त्यामुळे प्रवेश संख्या कमी झाल्याने तेथील शिक्षकांना नोकरीपासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे प्रवेशित विद्यार्थ्यांना जवळच्या महाविद्यालयात वर्ग केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)