शिक्षकांच्या नियुक्‍ता दोन दिवसांत भरण्याचा इशारा

अन्यथा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन : स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांचा पवित्रा
 
पुणे – जिल्ह्यातील भोर तालुक्‍यासह अन्य तालुक्‍यातील शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही, प्रत्येकवेळी अश्‍वासने आणि मिळमिळत उत्तरे दिली जातात. त्यामुळे येत्या दोन दिवसांत यावर तोडगा काढा, शिक्षकांची नियुक्‍ती करा, अन्यथा कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसेल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतारे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिला आहे. त्यावेळी गटनेते शरद बुट्टेपाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत शिक्षकांची नेमणूक व्हावी असे सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 21) स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, सभापती राणी शेळके, प्रवीण माने, सुजाता पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रगोत्री, सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख महादेव घुले, सदस्य रणजित शिवतारे, भाजपा गटनेते शरद बुट्टेपाटील, शिवसेना गटनेत्या आशा बुचके यासह समितीचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑनलाईन बदली प्रक्रियानंतर अनेक शिक्षकांना दुर्गम भागातील जागा मिळाल्या. मात्र, यातील अनेक शिक्षक हे बदलीच्या ठिकाणी रूजू झाले नाहीत. यामध्ये भोर तालुक्‍यात 104 तर, वेल्हे तालुक्‍यात 90 शाळांमध्ये शिक्षक नाहीत. याबाबत शिवतारे म्हणाले, प्रशासनाने दुर्गम भागातील शाळेत बदल्या झाल्यानंतर शिक्षकांना रूजू होण्यास सांगितले. मात्र, अनेकांनी कारणे देत नेमून दिलेल्या शाळेवर रूजू होण्यास असमर्थता दर्शविली. अशा शिक्षकांवर थेट कारवाईची मागणी त्यांनी केली.

आंतरजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना समानीकरणानुसार पदस्थापना देण्यात येणार आहे. त्यांना त्यांच्या पसंतीने शाळा मिळावी यासाठी समुपदेशन ठेवण्यात आले; परंतु शिक्षक समुपदेशनाला हजर राहिले नाही. ज्या तालुक्‍यात अधिक जागा रिक्‍त आहेत त्याठिकाणी प्राधान्याने शिक्षक देण्यात येणार आहे. ज्यांना मान्य नाही, त्यांना परत ज्या जिल्ह्यातून आले त्याठिकाणी पाठविण्यात यावे. त्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये सदस्य आणि पदाधिकारी यांनीही एकमताने संमती दर्शवली आहे. त्यामुळे जे शिक्षक तयार होतील त्यांना पदस्थापना देण्यात येईल. 

– सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)