शिक्षकांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

निगडी – आदिमाया अंबाबाई… सांज ये गोकुळी… रिमझिम गिरे सावन… साजनीबाई येणार साजन माझा…एक मीरा एक राधा.. गोरी तेरा गाव बडा प्यारा.. अशा एक से बढकर एक गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते मधुगंध स्वरांजली गीतगायन स्पर्धेचे. आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळाच्या सरस्वती विद्यालयाच्या वतीने गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन व ईश स्तवनाने करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक गोविंदराव दाभाडे हे होते. तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सौ. अश्‍विनी दाभाडे, मुख्याध्यापक राजू माळे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, सुरेखा हिरवे, परीक्षक अंकिता तांबे सर्व शाखांचे शिक्षक व स्पर्धक आदी उपस्थित होते. मधुगंध स्वरांजली गीतगायन स्पर्धेत एकूण 35 शिक्षक गायकांनी आपली गीते सादर केली. यात अनुक्रमे प्रथम श्रीकांत किर्तीकर, द्वितीय मंगेश रेडेकर तर तृतीय पुरस्कार प्रतिभा भागवत यांना दिल्या. उत्तेजनार्थ पुरस्कार युगंधरा पाटील, जयश्री काळे, आस्मर सारिका यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन मोहिनी आणेकर यांनी केले तर संगीत साथसंगत प्रकाश कोळप, सुरेश वालगुडे, गणेश पांचाळ यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)