शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या पाठीशी ठाम

रहिमतपूर : सिद्धेश्‍वर पुस्तके यांचा सपत्नीक सत्कार करताना ना. रामराजे व इतर मान्यवर.

ना. रामराजे नाईक निंबाळकर यांची ग्वाही
रहिमतपूर, दि. 14 (प्रतिनिधी) – समाजामध्ये शिक्षिकांना आदराचे स्थान आहे. शिक्षकात फुट पडत आहे ही फूट मिटवावी लागेल. यामध्ये राजकारणाचा शिरकाव होता कामा नये.
शिक्षकांनी आपआपसांत न भांडता एकत्र राहणे गरजेचे असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहीन, अशी ग्वाही विधानसभा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. रहिमतपूर येथील आयोजित राज्य शिक्षक संघाचे राज्य संपर्क प्रमुख सिद्धेश्वर पुस्तके यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभात बोलत होते.
यावेळी आ. बाळासो पाटील, आ. जयकुमार गोरे, मा. आ. शिवाजीराव पाटील, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, बाळासो सोळस्कर, उद्योजक जयंत डांगरे, चंद्रकांत जाधव, अशोकराव पवार,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनिल माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, विठ्ठल जाधव, प्रा. शि. बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे, मनोज घोरपडे, संभाजी गायकवाड, नंदकुमार माने पाटील. आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्कारमूर्ती सौ. सुनिता व सिध्देश्वर पुस्तके यांचा सप्निक सत्कार करण्यात आला.
सिध्देश्वर पुस्तके म्हणाले, संघटना हीच शिक्षकांची ताकद आहे. यामुळेच मला काम करण्याची प्रेरणा मिळत गेली व काम करीत गेलो. हे प्रेम ही ताकत माझ्या पाठीशी कायम राहू द्या. मी माझ्या शेवट पर्यंत शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढत राहीन. यावेळी मा. आ. शिवाजीराव पाटील, आ. बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
राजेंद्र घोरपडे यांनी प्रस्तावना तर सुरेश गायकवाड, संतोष जगताप यांनी सूत्रसंचालन केले. मोहनराव निकम, बजरंग वाघ यांनी आभार मानले.यावेळी जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्य शिक्षक व बहुसंख्य पुस्तके गुरुजी प्रेमी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)