शिक्षकांच्या अडचणी सोडण्यासाठी कटिबद्ध : आ. सावंत

सातारा – शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्याचा माझा सदैव प्रयत्न असतो. माझा 6 वर्षांचा कालावधी हा गुणवत्तेसाठीच पूर्ण करणार आहे. शिक्षक हा जिवंत शिल्प व राष्ट्र घडवत असल्याने पारदर्शक पद्धतीने संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन आ. दत्तात्रय सावंत यांनी केले. दरम्यान, सुमारे 4 महिन्यामध्येच अत्याधुनिक सभागृहाचे काम पूर्ण केल्याने जिल्हा मुख्याध्यापक संघ गौरवास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे विद्याभवनमधील वरच्या मजल्यावरील सभागृहाचे उदघाटन आ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिह गायकवाड होते. अध्यक्ष सचिन नलवडे, विजय येवले, सुनील गाडे, यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)