शिक्षकांचे थकित व नियमित वेतन ऑफलाइन करावे

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी मान्य
शेवगाव – शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे थकीत व नियमित वेतन मे ते जुले 2018 महिंन्याचे वेतन ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. याबाबतचा शासनाने लेखी आदेश काढला आहे. शिक्षक परिषदेने याबाबत मागणीचे निवेदन आमदार नागों गानार यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे व शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांना दिल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यानी दिली आहे.
राज्यातील पाच लाख सत्तर हजार शिक्षक शिक्षकेतर यांचे वेतन शालार्थ वेतन प्रणालीद्वारे अदा केले जाते. मात्र 12 जानेवारीपासून या प्रणालीत दोष, निर्माण झाल्याने प्रणाली बंद पडली आहे. याचा परिणाम सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांचे वेतनाचा प्रश्न गंभीर बनला होता. याबाबत शासनाने ऑफलाइन पद्धतीने वेतन अदा करावे, असा लेखी आदेश निर्गमित केला आहे
त्यामुळे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांचे वेतनचा प्रश्न मार्गी लागला आहे.
ऑफलाइन पद्धतीने वेतन करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू ,भगवान साळूखे, अनिल बोरणारे ,नाशिक विभाग अध्यक्ष सुनिल पंडित व जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, शरद दळवी आदिंनी केली असल्याची माहिती शेवगाव शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)