शिक्षकांचे ज्ञानदानाचे कार्य आदर्शवत – पलांडे

अण्णापूर- ग्रामीण भागात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी केले. सरदवाडी (ता.शिरुर) येथील अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर गायकवाड यांच्या सेवापूर्ती समारंभात ते बोलत होते. ग्रामीण भागात स्पर्धात्मक व दर्जेदार शिक्षण देऊन पिढी घडविण्याचे कार्य शिरुर तालुक्‍यातील ग्रामीण भागातील शिक्षकांकडून होत आहे, त्यामुळेच येथे चांगली पिढी घडत आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी माई पलांडे, आबासाहेब गव्हाणे, शिरुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, शिरुर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहोकडे, सरदवाडीचे सरपंच विलास कर्डिले, उपसरपंच किशोर सरोदे, शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांचे प्राचार्य, शिक्षक,ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)