शिक्षकांची रिक्त पदे अन समायोजनावरून गदारोळ

सातारा पंचायत समिती सभा : घरकुल योजनेवरून टिकास्त्र
सातारा,दि.14 प्रतिनिधी- तालुक्‍यातील शिक्षकांची रिक्त पदे अन्‌ समायोजन कारणावरून सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत गदारोळ झाला. त्याचबरोबर सरकारची घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांना अडचणी येत असताना अधिकारी कोणतीच मदत करत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. सभापती मिलींद कदम यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या मासिक आढावा सभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. त्यावेळी उपसभापती जितेंद्र शिंदे, गटविकास अधिकारी अस्मिता गावडे यांच्यासह सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.

आढावा सभेच्या दरम्यान, सदस्य राहूल शिंदे यांनी तालुक्‍यातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन अद्याप का करण्यात आले नाही. तसेच शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर शिक्षकांचे निर्णय घेण्याचे अधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना असल्याचे उपसभापती जितेंद्र सावंत यांनी सांगितले. सावंत यांच्या उत्तरावर शिंदे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी थेट मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन करायचे का, असा प्रश्‍न विचारला. सभापती मिलींद कदम यांनी आंदोलन करण्याची आवश्‍यकता नसून आपण सर्वजण मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेवूयात असे सांगितले. दरम्यान, भाजपचे सदस्य संजय घोरपडे यांनी सरकारची दीन दयाल उपाध्याय आवास योजनेची प्रशासनाकडून ठोस अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप केला. त्याचबरोबर अशिक्षित लाभार्थ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच यावेळी तालुक्‍यातील मुलांना चांगला पोषण आहारासाठी सदस्यांनी मुले दत्तक घेतली असून अधिकाऱ्यांनी ही पुढाकार घ्यावा असे सूचित करण्यात आले.

सत्ताधारी गटातच कलगीतुरा
सातारा पंचायत समितीवर आ.शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. सभापती व उपसभापतीपदावर देखील त्यांच्याच गटाचे सदस्य आहेत. असे असताना आढावा बैठकीच्या निमित्ताने अधिकाऱ्यांना प्रश्‍न विचारताना अप्रत्यक्ष सभापतींना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सदस्यांनी केलेल्या आरोपावर व प्रश्‍नावर सभापती सडेतोड खुलासा व ज्या ठीकाणचे आरोप होत आहेत त्या ठीकाणी प्रत्यक्ष भेट देण्याचे सांगून जणू हवाच काढत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)