शिक्षकांकडून अवांतर अपेक्षा बाळगू नका -खंडागळे

नारायणगाव -सर्वच शिक्षक आपल्या परीने विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत असतात, त्यासाठी ते विविध उपक्रम वर्गात राबवितात; परंतु सर्व विद्यार्थी सारख्या बुद्धिमत्तेचे नसल्याने काही विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे निर्माण होतात. यावेळी त्यांच्या पालकांची जबाबदारी महत्वाची असते; मात्र ते जबाबदारी झटकून मोकळे होतात व शिक्षकांकडूनच अवांतर अपेक्षा धरतात. हे चुकीचे असल्याचे मत सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी अनंतराव खंडागळे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद शाळा मांजरवाडी शाळेत शताब्दी वर्षाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिक्षकांपेक्षा पालकांच्या सहवासात विद्यार्थी जास्त काळ असतो, त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी मोठी आहे. शिक्षक त्यांचे काम करतीलच त्यांच्याकडे दुजाभावपणा नसतो म्हणून पालकांनी त्यांच्याविषयी द्वेष भावना ठेवू नका; मात्र शिक्षकांनी जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर त्या शिक्षकाची पूर्ण पिढीच बरबाद होते. सर्वांसाठी प्राथमिक शिक्षक ही जीवनातील अनमोल भेट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, सरपंच संतोष मोरे, उपसरपंच शंकर मुळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास काळे, हरिश्‍चंद्र गायकवाड, किरण थोरात, मंगेश खंडागळे, गांडूळ, मुख्याध्यापक यशवंत गवारी, तारामती मुळे, राजश्री थोरवे, धनश्री दाते, स्वाती सोनवणे, हेमलता वाव्हळ, सुनील ठिकेकर, दिनेश वैष्णव, संजय रणदिवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिश्‍चंद्र गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन संजय रणदिवे तर संतोष मोरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)