शिक्रापूर हद्दीतील चौदा मटका माफिया तडीपार

शिक्रापूर पोलिसांची कारवाई

शिरूर-शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वेळोवेळी मटका व्यवसाय करून गुन्हेगारी करणाऱ्या चौदा गुन्हेगारांवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक व शिक्रापूर पोलिसांच्या वतीने तडीपारीची कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे शिरूर तालुक्‍यातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये छुप्या पद्धतीने मटका व्यवसाय करून गुन्हेगारी करणाऱ्या चौदा जणांवर एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातील शिरूर, हवेली, दौंड, खेड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली असून यापैकी सात जणांवर सदर कारवाईची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तर पांडुरंग नवनाथ जाधव, सचिन गोविंद शिनगारे, दीपक तुकाराम वाळके, सतीश अरुण केदारी (चौघे रा. बांदल कॉम्प्लेक्‍स, शिक्रापूर), अशोक छगन मुसळे (रा. सणसवाडी, ता. शिरूर), विशाल निवृत्ती गवळी (रा. शिक्रापूर), प्रमोद श्रीमंत पवार (रा. वाजेवाडी, चौफुला, ता. शिरूर) यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून लवकरच त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तडीपारीची कारवाई करण्यात आलेले सर्व गुन्हेगार मटका व्यावसायिक असून यापुढील काळामध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले आहे.

  • यांच्यावर झाली तडीपारीची कारवाई
    कैलास अरुण पाटील (वय 35), महेश अशोक सातपुते (वय 30, दोघे रा. आळंदी रोड भोसरी पुणे), भरत शहाजी गव्हाणे (वय 30, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर), किरण काळूराम दरेकर (रा. सणसवाडी), आकाश लक्ष्मण धाडगे (वय 19, रा. सणसवाडी), वैभव अनंत साळुंके (वय 21), परमेश्वर मधुकर गोरे (वय 20, दोघे रा. बांदल कॉम्प्लेक्‍स शिक्रापूर) या सात जणांवर तडीपारीच्या कारवाईची अंमलबजावणी करण्यात आली आहे. पोलीस नाईक अनिल जगताप व विनायक नागरगोजे यांनी या सात आरोपींना तडीपारीच्या हद्दीच्या बाहेर नेऊन त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दाखल केले आहे.
  • हे गुन्हेगार दिसल्यास पोलिसांशी संपर्क करा
    शिक्रापूर पोलिसांच्या वतीने तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्या चौदा गुन्हेगारांना आता तडीपार करण्यात आलेल्या जिल्ह्यातील कोणत्याही हद्दीमध्ये पोलिसांच्या आदेशानुसार प्रवेश करता येणार नाही. तडीपारीची कारवाई करण्यात आलेले कोणतेही गुन्हेगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार केलेल्या तालुक्‍यात कोठेही आढळून आल्यास शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)