शिक्रापूर शाळेकडून पोलिसांना शेंगदाणा लाडू

– गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन : पोलिसांनी आरोग्याची काळजी घ्यावी
शिक्रापूर -येथे जिल्हा पिरषद प्राथमिक शाळेत गणेशोत्सव निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत असून दोन दिवस मुलांच्या रांगोळी, वक्‍तृत्व स्पर्धा आणि तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमांतर्गत शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना शेंगदाणा लाडू आणि चिक्की वाटप केले. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलिसांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पुढाकाराने यंदा शिक्रापूर पोलिसांना तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमांतर्गत शेंगदाणा-लाडू देण्याचा उपक्रम सोमवारी (दि.28) पार पडला. यावेळी पोलीस निरिक्षक रमेश गलांडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे, शिवकांत खोसे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दत्तात्रय गिरमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, महेंद्र शिंदे, हवालदार दत्तात्रय शिंदे, संतोष पवार, महिला पोलीस सुवर्णा गायकवाड आदी सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लाडू आणि चिक्कीचे वाटप केले.
यावेळी साधना शितोळे, केंद्रप्रमुख रत्नमाला मोरे, मुख्याध्यापिका रोहीणी खंडागळे, सुरेखा चव्हाण, वर्षा जकाते, मीना धुमाळ, अंजली कोळपकर व शिक्षिक-शिक्षिकांनी या उपक्रमात विशेष योगदान दिले. तर शाळेतील सुमारे 1200 विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापिका रोहिणी खंडागळे म्हणाल्या, पोलीस हे 24 तास आपली सेवा बजावतात. तसेच धावपळीच्या कामामध्ये असल्याने त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना शितोळे यांनी केले तर सुरेखा चव्हाण यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)