शिक्रापूर विद्याधाम प्रशालेस दोन ई-लर्निंग संच भेट

विरधवल करंजे आणि डॉ. मच्छिंद्र गायकवाड यांची माहिती

शिक्रापूर – येथील विद्याधाम प्रशाला शाळेस रोटरी क्‍लब शिक्रापूरच्या वतीने 2 लाख रुपये किंमतीचे दोन ई-लर्निंग संच भेट देण्यात आली आहेत, अशी माहिती रोटरी क्‍लब ऑफ शिक्रापूरचे संस्थापक विरधवल करंजे आणि डॉ. मच्छिंद्र गायकवाड यांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला शाळेस दोन ई-लर्निंग संच भेट देताना प्रशाळेमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा बनविण्यासाठी 25 हजार रुपयांची मदत देखील रोटरी क्‍लबच्या वतीने केली आहे. याप्रसंगी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बोरा, शिक्रापूरचे सरपंच जयश्री भुजबळ, ग्रामपंचायत सदस्या जयश्री दोरगे, प्रशालेचे प्राचार्य सोनबापू गद्रे, उपप्राचार्य रामदास शिंदे, रोटरी क्‍लब ऑफ शिक्रापूरचे संस्थापक विरधवल करंजे आणि डॉ. मच्छिंद्र गायकवाड, प्रा.रामदास थिटे, संजिव मांढरे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य सोनबापू गद्रे यांनी प्रशालेच्या कार्याची माहिती दिली. तर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा यांनी प्रशालेस शालेय साहित्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल रोटरी क्‍लबचे आभार मानले.

यावेळी डॉ. मच्छिंद्र गायकवाड म्हणाले, शिरुर तालुक्‍यातील 48 शाळेंना रोटरी क्‍लबच्या वतीने ई-लर्निंग संच तर 8 प्रशालेंना विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने जलशुद्धिकरण प्रकल्प उभारुन दिल्याचे सांगत विद्याधाम प्रशाला शाळेसाठी आवश्‍यक ती सर्व मदत करणार आहे. कार्यक्रमप्रसंगी विद्याधाम प्रशालेतील अध्यापक मारुती घुमे, वरिष्ठ लिपिक किसन रासकर आणि शिपाई किसन खोमणे यांचा सेवापुर्ती निमित्ताने सपत्निक सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गणेश मांढरे यांनी केले. तर उपप्राचार्य रामदास शिंदे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)