शिक्रापूर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

  • ट्रकचालकावर गुन्हा दाखल

शिक्रापूर – येथील चाकण-शिक्रापूर रस्त्यावर ट्रकची दुचाकीस पाठीमागून धडक बसून एकाचा जागीच मृत्यू झाला तर, एकजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.11) दुपारच्या सुमारास घडली आहे. प्रमोद निवृत्ती बोचरे असे मृत्यू झालेल्याचे नाव असून प्रवीण भगवान राहणे हा जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रमोद बोचरे आणि प्रवीण राहणे हे दोघे (एम. एच. 15 डी. झेड. 5438) या दुचाकीवरून चाकण बाजूने शिक्रापूरकडे येत होते. यावेळी शिक्रापूरनजीक आल्यानंतर पाठीमागून आलेल्या (एच. आर. 55 व्ही. 1999) ट्रकची या दुचाकीस जोरात धडक बसली. यावेळी दुचाकीवरून दोघे खाली पडल्याने प्रमोद निवृत्ती बोचरे (वय 23, रा. देवगाव, ता. निफाड, जि. नाशिक) याच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकीवरील प्रवीण भगवान राहणे (वय 23, राहणार चंदनापुरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) हा जखमी झाला आहे. याबाबत राजेंद्र चांगदेव खुळे (रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी ट्रकचालक बलजित रणधीर राजपूत (रा. केलंगा सवईपणा, पोस्ट बिचवारा, जि. भिवारी, राज्य हरियाणा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातांची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले. शुक्रवारी (दि.11) ट्रकचालक बलजित रणधीर यास शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास जामिनावर मुक्त केले आहे. याचा अधिक तपास तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)