शिक्रापूर बस स्थानकात युवतीचा विनयभंग

शिक्रापूर -मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथून एका युवतीला फोन करून शिक्रापूर येथील बस स्थानकात बोलावून तिला शिवीगाळ, मारहाण करत विनयभंग करण्यात आला असल्याची घटना घडली. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून शिक्रापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
अमोल दत्ता राठोड (रा. लोणार, ता. लोणार जि. बुलडाणा) असे गुन्हा दाखल झोलल्याचे नाव आहे. पीडित युवतीने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. मांजरी बुद्रुक येथील युवती घरी असताना तिच्या मोबाईलवर “तुझे घेतलेले पैसे तुला देतो, तू शिक्रापूर बस स्थानकात ये’ असा मेसेज अमोल राठोड याने केला. याप्रमाणे ही युवती शिक्रापूर बस स्थानकात आली असताना अमोल हा तिला “बसस्थानकाच्या आतील बाजूस चल, तेथे तेथे पैसे ठेवलेत’ असे म्हणाला आणि त्यावेळी त्याने आत जात असताना तिच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. युवतीने प्रतिकार केला असता अमोल याने तिला मारहाण करत शिवीगाळ केली. युवतीच्या तक्रारीवरून लोणीकंद पोलिसांनी अमोल विरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. घटना शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेली असल्यामुळे तपास शिक्रापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगदाळे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)