शिक्रापूर बसस्थानकातील ट्रक पेटला

शिक्रापूर- येथील एसटी स्थानकात अनेक दिवसांपासून बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या बंद ट्रकला बुधवारी (दि.10) सायंकाळच्या सुमारास आग लागली. परंतु स्थानिक नागरिकांच्या दक्षतेमुळे ही आग आटोक्‍यात आणण्यात यश आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एसटी बसस्थानकाच्या आवारामध्ये गेली अनेक दिवसांपासून (एमएच 04 सीयू 8005) ट्रक उभा आहे. अनेकदा एसटी आगर व्यवस्थापकांना माहिती देऊन सुद्धा हा ट्रक हलविण्यात आलेला नाही. बुधवारी (दि.11) सायंकाळी या ट्रकला आग लागल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी शिरूर तालुका वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष कानिफ सासवडे यांनी पाण्याचा टॅंकर उपलब्ध केला. येथील स्थानिक ऍड. राजेश धुमाळ, पप्पू सासवडे, आमीर शेख यांसह आदींनी ही आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी कोणीतरी अज्ञाताने हा ट्रक पेटविल्याचा अंदाज अनेकांनी वर्तविला आहे. तर यावेळी या ट्रकला दुपारच्या सुमारास देखील आग लागली होती, ती आग आम्ही येऊन विझवून गेलो असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु स्थानिकांनी वेळीच दक्षता घेतल्याने ही आग आटोक्‍यात आणता आली. शेजारी कुठेही आगीचे लोळ पोहचू शकले नाही. त्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला गेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)