शिक्रापूर-चाकण रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्य

शिक्रापूर- येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर असलेल्या पिंपळे जगताप गावच्या हद्दीमध्ये दुचाकीहून चाललेल्या दोघांना अज्ञात वाहनाची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला असल्याची घटना शुक्रवारी (दि. 227) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निलेश आनंदा वाघुले (रा. सणसवाडी, ता. शिरूर) असे जागीच मृत्यू झालेल्याचे नाव आहे, त्याचा साथीदार अविनाश अशोक जाधव (रा. सणसवाडी, ता. शिरूर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तर रणजीत आनंदा वाघुले (रा. सणसवाडी ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, मृत निलेश व अविनाश हे दोघे जण दुचाकी (एमएच 12 सीझेड 8968)वरून चाकण बाजूने शिक्रापूरकडे येत असताना पिंपळे जगताप येथील जवाहर नवोदय विद्यालय जवळ आले असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाची त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने निलेशचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाशला गंभीर दुखापत झाली आहे. तर अपघातानंतर वाहनचालक तेथून वाहनासह पळून गेला आहे त्यामुळे वाहनाची देखील माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगदाळे करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)