शिक्रापूर-चाकण रस्त्यावर पिकअप उलटली

शिक्रापूर-शिक्रापूर-चाकण रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी पिकअप उलटून रस्त्याचे कडेला लघुशंकेसाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू झाला असल्याची घटना ताजी असतानाच त्याच ठिकाणी आज दुपारच्या सुमारास एक पिकअप उलटून त्यामधील चालक व एक ज्येष्ठ महिला जखमी झाली.
पिकअप चालक अमोल किसन व्यवहारे (वय 29, रा. अहमदनगर) व ज्येष्ठ महिला विठाबाई खंडू खोडदे (वय 58) अशी जखमींची नावे असून, त्यांना शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी शिक्रापूर-चाकण रस्त्यावर जातेगाव फाटा नजीक लघुशंकेसाठी उभा असलेल्या प्रशांत वडमारे या युवकाचा पिकअप अंगावर उलटल्याने मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आज दुपारच्या सुमारास याच ठिकाणी पुन्हा एक पिकअप रस्त्याचे कडेला उलटली. तर याबाबत हकीगत अशी की, एक टेम्पो (एमएच 14 डीएम 2801) शिक्रापूर बाजूने चाकण बाजूकडे जात असताना जातेगावफाटा नजीक गेल्यानंतर टेम्पोचा खालील स्टेरिंग रॉड निखळला. त्यामुळे टेम्पोचालकाचा ताबा सुटला. त्याचवेळी चाकण बाजूने शिक्रापू बाजूकडे पिकअप (एमएच 16 एवाय 7309) येत होती. त्यावेळी पिकअप टेम्पोवर आदळू नये म्हणून पिकअप चालक अमोल व्यवहारे हा पिकअप तसेच रस्त्यावरील वाहनांना वाचविण्याचा प्रयत्न करत असताना रस्त्याचे कडेला जाऊन उलटला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)