शिक्रापूर काळभैरवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

शिक्रापूर- येथील श्री काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय कोयाळी पुनर्वसन या विद्यालयाच्या आठवीमध्ये शिकणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले, अशी माहिती मुख्याध्यापक धनाजी थोरात यांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील श्री काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय कोयाळी पुनर्वसन या विद्यालयातील टोपले शुभांगी कृष्णा, पानमंद दीक्षा नाथा, पुजारी लक्ष्मी बाबासो, शहाणे सानिका अशोक, पवळे दिनेश दादाराव, भारस्कर आशिष सुभाष या विद्यार्थ्यांनी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक गणेश खेडकर आणि दत्ता लांडगे यांनी मार्गदर्शन केले. तर सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे मुख्याध्यापक धनाजी थोरात, सरपंच जयश्री भुजबळ, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, शिक्रापूर व्यापारी असोशियनचे अध्यक्ष अशोक शहाणे यांनी अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)