शिक्रापूरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर – येथील मलठण फाटा येथे राहणाऱ्या अक्षय सायकर (वय 23) या युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. संतोष दत्तात्रय सायकर (रा. मलठण फाटा, शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, शिक्रापूर येथील अक्षय सायकर हा रविवारी सायंकाळी घरी होता, त्यांनतर तो घरातून बाहेर आलाच नाही त्यामुळे घरामध्ये त्याला आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद त्याने दिला नाही म्हणून घरात पहिले असता त्याने घरातील छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे दिसून आले, त्यांनतर त्याला शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देविदास दगडे हे करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)