शिक्रापूरसह परिसरात बहुतांश इंग्रजी शाळांतून लूट

शिक्रापूर-पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे मोठे जाळे तयार झाले असून या शाळांच्या माध्यमातून पालकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सक्ती केल्या जात असून नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे.
शिक्रापूर येथे अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी मोठे जाळे तयार केले आहेत, सध्याच्या धावत्या युगामध्ये अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी झटत असतात, काही पालक तुटपुंज्या पगारावर काम करत असताना देखील ते त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे; परंतु येथे पाल्यांना प्रवेश मिळविण्यासाठी मोठी रक्कम पालकांना मोजावी लागत आहे. तर मोठी रक्कम व अवाढव्य फी भरूनही पालकांना त्यांच्या मुलांना शालेय अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तके, वह्या आमच्याकडूनच घ्याव्यात, दप्तरे तसेच कपडे ते देखील आमच्याकडूनच घ्यावे लागतील आमच्याकडे पैसे भरा आम्ही कपडे, दप्तरे, वह्या, पुस्तके देतो असे सांगून दप्तराच्या व पुस्तकाच्या किमतीपेक्षा दुपटीने पैसे घेतले जात आहेत. इतकेच नव्हे; तर शिक्रापूर व परिसरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना आठवडाभर शाळेमध्ये येताना डब्यामध्ये काय खायला द्यायचे याचे देखील तक्ते देण्यात येत आहेत. यामध्ये कित्येकदा महागडे खाद्यपदार्थ व वस्तू असल्यामुळे पालकांना देखील या बाबींना सामोरे जावे लागत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडून पिळवणूक होत असताना देखील आपल्या पाल्याचे नुकसान नको म्हणून नागरिक व पालक देखील मुकाट्याने हा त्रास व अन्याय सहन करीत आहेत. तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये काही अनधिकृत शाळा असल्याचे जिल्हा परिषदेच्या वतीने सांगण्यात आलेले असताना देखील त्या शाळा आजही सुरु आहेत त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालकांवर कोणाचाही वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे; परंतु अशा होत असलेल्या प्रकारांवर शिक्षण विभागाचे अधिकारी लक्ष देऊन हे प्रकार बंद करणार र्कों अशी चर्चा नागरिक करत आहेत.

  • पालकांनी याबाबत तक्रार करावी – संजय पाचंगे
    इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळांमध्ये असे प्रकार सुरु आहेत; परंतु याबबत पालकांनी शिक्षण आयुक्तांकडे तक्रार करावी. अनेक ठिकाणी अनधिकृत शाळा सुरु असल्याचे आढळून येत आहे. तसेच कोठेही अनधिकृत शाळा सुरु असल्यास गटविकास अधिकारी यांनी शिक्षण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने गटशिक्षणाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे संजय पाचंगे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)