शिक्रापूरच्या हद्दीत सहा महिन्यात 70 वाहने चोरी

मागील संपूर्ण 2017 वर्षात 109 वाहनांची चोरी

शिक्रापूर – येथील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी वाहनांच्या चोरींचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून कित्येक दुचाक्‍यांसह चारचाकी वाहने देखील चोरी गेली आहेत. 2017 मध्ये वर्षभरात तब्बल 104 दुचाकी तर, पाच चारचाकी वाहनांची चोरी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून झाली होती. तर, चालू 2018 मध्ये जानेवारी पासून आजपर्यंत सहा महिन्यात तब्बल चार मोठ्या वाहनांसह 70 वाहनांची चोरी झाली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सणसवाडी, पिंपळे जगताप, पाबळ, जातेगाव, कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, तळेगाव ढमढेरे, पिंपळे जगताप यांसह आदी गावांमध्ये दुचाक्‍या चोरींचे प्रकार घडत आहेत. काही गावांमधील नागरिक तर दुचाक्‍या चोरांना अक्षरशः वैतागले आहेत. मागील 2017 वर्षामध्ये 104 दुचाकी तर पाच चारचाकी अशा 109 वाहनांची चोरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झाली होती. त्यांनतर जानेवारी 2018 या एका महिन्यामध्ये अनेक गावांतून अकरा दुचाकी आणि एक तीनचाकी रिक्षा चोरी गेली होती. तर आता चालू वर्षामध्ये अवघ्या सहा महिन्यात सुमारे 66 दुचाकी, एक तीन चाकी रिक्षा आणि तीन चारचाकी वाहने असे सुमारे 70 वाहनांची चोरी झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर 2017 मध्ये वाहने चोरीचे दाखल असलेल्या एकशे नऊ गुन्ह्यांपैकी एकोणीस गुन्ह्यातील आरोपी यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात आले असून त्यांचेकडून चोरी गेलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर 2017 मध्ये वाहने चोरीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर चोरी गेलेल्या आठ दुचाकी इतरत्र बेवारसपणे मिळून आल्या असून यातील आरोपी मिळून आलेले नाहीत. यापूर्वी शिक्रापूर पोलिसांनी मार्च 2017 मध्ये वाहनचोरांची एक टोळी पकडली असताना त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतून 11 दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती. तर त्यांचेकडून चोरीच्या काही दुचाक्‍या देखील हस्तगत करण्यात आलेल्या होत्या. मात्र, पोलिसांनी पकडलेले त्या दुचाकीचोर अटक असताना देखील या भागातून वाहन चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे पोलीस देखील हतबल झाले होते. परंतु दुचाकी चोरीस जात असल्यामुळे नागरिक आजही हैराण झाले आहेत. इतक्‍या मोठ्या प्रमाणात वाहनांच्या चोऱ्या होत असताना चोरीची ही वाहने जातात तरी कोठे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या चोरीच्या घटना घडत असताना आज दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटनामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. त्यामुळे या दुचाकी चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील नागरिक करत आहे.

वाहन चोरीची टोळी कार्यरत असल्याची शक्‍यता
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची चोरी होत आहे. वाहन चोर वेगवेगळ्या शक्कल लढवून चोरी करत आहेत. यामध्ये चारचाकी वाहनांचा सुद्धा समावेश असून जिल्ह्यातून हजारो वाहने प्रत्येक वर्षी चोरीस जातात. परंतु चोरीच्या दुचाकी आणि वाहने मिळून येत नाहीत तसेच आरोपी देखील सापडत नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये वाहन चोरांची मोठी टोळीच कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)