शिक्रापूर- या भागातील हातपंप काही दिवसांपासून बंद पडल्यामुळे येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत शिक्रापूरचे उपसरपंच आबाराजे मांढरे आणि माजी सरपंच बापूसाहेब जकाते यांनी तातडीने दोन दिवसात दखल घेत दोन हातपंप दुरुस्त करून नागरिकांची तहान भागवली.
शिक्रापूर येथील दिघेवस्ती, लव्हार्डे पुनर्वसन गावठाण या भागातील हातपंप काही दिवसांपासून नादुरुस्त होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. येथील काही महिलांनी शिक्रापूरचे उपसरपंच आबाराजे मांढरे आणि माजी सरपंच बापूसाहेब जकाते यांच्याकडे अडचणी मांडल्या. याची तातडीने दखल घेत पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायत समिती पथकप्रमुख अनिल थोरात यांच्या माध्यमातून हातपंप यांत्रिकी गोरक्ष सातकर दोघेवस्ती परिसरातील बाळासाहेब चह्याळ, सर्जेराव टेमगिरे, भाऊसाहेब दोघे यांच्या मदतीने या भागातील दोन हातपंप दुरुस्त करून घेतले. यावेळी येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानून समाधान व्यक्‍त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)