शिक्रापुरात सामुदायिक विवाह सोहळ्याच्या मंडपाचे भूमिपूजन

सणसवाडी- शिक्रापूर (ता. शिरूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या मंडपाचे भूमिपूजन काशीनाथ भुजबळ यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी आरपीआयचे अध्यक्ष नवनाथ कांबळे होते.
यावेळी समता परिषदेचे राज्य संघटक सोमनाथ भुजबळ, सोहळ्याचे आयोजक, केंद्रीय नवोदय विद्यालयाचे उपाध्यक्ष सुरेश भुजबळ, कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अशोक भुजबळ, रामदास भुजबळ, भगवान गायकवाड, विष्णु हरगुडे, संजय केवळे, लद्दाराम पटेल, तुकाराम हरगुडे, संपत खरपुडे, कैलास भुजबळ, रमेश गडदे, अकुंश केवटे, नाथा केवटे, संतोष गायकवाड गुरूजी, बाळासाहेब कातोरे, इलेक्‍ट्रीशीयन सुरेश भुजबळ, मुख्याध्यापिका पावशे, जयश्री धुमाळ, दोडके, खरपुडे, बाळासाहेब ढमढेरे, प्राचार्य नवनाथ गायकवाड, अमर भुजबळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात नवनाथ कांबळे म्हणाले की, सामुदायिक विवाह सोहळ्याचे शिस्तबद्ध नियोजन केले आहे. या सोहळ्यात गेल्या 12 वर्षांत 2400 कुटुंबांतील मुलांची लग्ने मोफत लावून देण्यात आली आहेत. त्या कुटुंबांना कर्जापासून मुक्‍त ठेवले आहे. यावेळी सोमनाथ भुजबळ यांनी सर्व महिला कार्यकर्त्यांचे कौतुक केले. नवनाथ गायकवाड यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)