शिक्रापुरात विद्युत रोहीत्राला अचानक आग

नागरिकांच्या तत्परतेमुळे हानी टळली

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एसटी स्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला असेलल्या विद्युत रोहित्राला सायंकाळच्या सुमारास उष्णतेमुळे अचानक आग लागली. त्यावेळी त्या विद्युत रोहित्राच्या आसपास असलेले नागरिक सैरावैरा पळू लागले. परंतु नागरिकांच्या तत्परतेमुळे आग विझविण्यात आली असून त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. शिक्रापूर येथील तळेगाव रोड परिसरात एसटी स्थानकसमोर असलेल्या विद्युत रोहित्राला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी येथील नागरिक भयभीत होऊन पळू लागले. परंतु येथील आग विझविणे गरजेचे असताना येथे शेजारी असलेले आयुब शेख, प्रवीण बामणे, गुरुदास चंद्रावळे, रुपेश बोरुडे, अशोक सातकर यांनी तत्परतेने रोहित्राजवळ जात रोहित्रावर वाळू आणि माती टाकली. त्यामुळे आग आटोक्‍यात आली. यावेळी विद्युत रोहित्राला आग लागली असल्याची माहिती मिळताच विद्युत वितरणचे कर्मचारी ज्ञानेश्‍वर पांडे, भरत पवार यांनी त्या ठिकाणी धाव घेत संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित केला. आग आटोक्‍यात आणणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. सध्या असलेल्या उष्णतेमुळे विद्युत रोहित्राला आग लागली असून नागरिकांनी आग विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे विद्युत वितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्‍वर ढाकणे यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)