शिक्रापुरात वाहतूक सुरक्षा सप्ताहातच वाहनांच्या रांगा

वाहनचालक व ग्रामस्थ वाहतूककोंडीने झाले त्रस्त

शिक्रापूर-येथे काही वर्षांपूर्वी पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सिग्नल बसविण्यात आले होते; परंतु सिग्नलमुळे वाहतूककोंडी होत असल्याचे लक्षात आल्यामुळे प्रशासनाने हे सिग्नल बंद केले. आता वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरु झाल्याने पुन्हा सिग्नल दुरुस्त करून चालू केल्याने शिक्रापुरातील वाहतूककोंडीत अजूनही भर पडली आहे व त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
शिक्रापूर येथील पुणे-नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी या भागातील काही कंपन्यांच्या मदतीने या रस्त्यावर सिग्नल बसविण्यात आले होते. सिग्नल बसविल्यानंतर देखील वाहतूककोंडीमध्ये काही बदल झाला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने येथील सिग्नल बंद केले. अनेक वर्षे येथील सिग्नल बंद राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी एक मोठा सिग्नल वाहनाच्या धडकेत जमीनदोस्त झाला त्यामुळे पुन्हा या परिसरातील कंप कंपन्यांनी सिग्नल सुरु केले आहे. आज सकाळी येथील सिग्नलचे पूजन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करत वाहतूक सुरक्षा सप्ताहाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर परिसरातील काही कंपन्यांच्या वतीने मुलामुलींना एकत्र करून वाहने हळू चालवा, हेल्मेटचे फायदे, रस्ता ओलांडण्याची पद्धत, बसमधून उतरण्याची पद्धत, वाहन हळू चालवा-जीव वाचवा यांसह आदी फलक लावत जनजागृती करण्यात आली. हा उपक्रम पुढील तीन दिवस राबविण्यात येणार आहे; परंतु येथील लहान रस्ते व वाहनांची संख्या जास्त त्यामुळे वाहतूककोंडी सोडविणे कठीण झाले आहे. आज दुपारपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे काही वेळाने पोलिसांनीच सिग्नल यंत्रणा बंद करून वाहतूककोंडी सुरळीत करून घेतली; परंतु वाहन चालक, नागरिक व ग्रामस्थांना या वाहतूककोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला आहे.

  • एका कंपनीच्या वतीने वाहतूक सुरक्षा सप्ताहामुळे अनुपालन हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यामध्ये वाहतुकीच्या नियमनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. सिग्नल सुरू केले असून त्या सिग्नलमध्ये वेळेची सेटिंग योग्य नसल्यामुळे वाहने सोडणे अशक्‍य होत आहे. तरी लवकरच यावर तोडगा काढला जाईल.
    -सोमनाथ दिवटे, वाहतूक विभाग प्रमुख तथा उपनिरीक्षक शिक्रापूर
  • पोलीस अधीक्षकांना करावा लागला वाहतूककोंडीचा सामना
    शिक्रापूर येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाची सुरवात केल्यानंतर काही वेळातच वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. त्यानंतर काही वेळाने पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे नगर बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात असताना त्यांना देखील या वाहतूककोंडीत अडकून वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)