शिक्रापुरात महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप

शिक्रापूर-येथे यशकीर्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था शिक्रापूर व जनशिक्षण संस्थान पुणे यांच्या संयुक्त वतीने महिलांना काही प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. फॅशन डिझायनिंग कोर्स पूर्ण केल्याबद्दल महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
शिक्रापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांनी मुलगी वाचवा, मुलगी जगवाचा संदेश दिला. याप्रसंगी यशकीर्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्षा मंगल सासवडे, सचिव वैशाली खेडकर, सरपंच जयश्री भुजबळ, ग्रामपंचायत सदस्या जयश्री दोरगे, शिरूर समन्वयिका ललिता पोळ, माहेर संस्थेच्या कार्यकर्त्या सुरेखा थिटे, अनामिका चव्हाण, पल्लवी खामकर यांसह आदी प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या. तर महिलांनी मिळालेल्या प्रशिक्षणाचा पुरेपूर फायदा घेऊन आपला विकास करावा, असे ग्रामपंचायत सदस्या जयश्री दोरगे यांनी सांगितले. तर महिलांनी त्यांना मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा फायदा घेणे गरजेचे असल्याचे मत ललिता पोळ यांनी व्यक्त केले. तर यापुढे देखील महिलांसाठी विविध प्रशिक्षण सुरु ठेवणार असल्याचे प्रशिक्षिका सुषमा संपत गायकवाड यांनी सांगितले. सूत्रसंचालन यशकीर्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्षा मंगल सासवडे यांनी केले तर प्रास्ताविक सचिव वैशाली खेडकर यांनी केले व प्रणाली सासवडे हिने आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)