शिक्रापुरात भव्य ग्रामीण रुग्णालय

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथे भव्य असे ग्रामीण रुग्णालय असून या ठिकाणी मिळणाऱ्या आधुनिक सुविधांमुळे सध्या सणसवाडी, जातेगाव, पिंपळे जगताप यांसह आदी परिसरातील नागरिक व रुग्ण येथे येत असतात; परंतु या रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, हा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एखाद्या खासगी रुग्णालयाला लाजवेल असे भव्य आणि मोठे ग्रामीण रुग्णालय आहे. या ठिकाणी रुग्णांना अनेक सुविधा उपलब्ध असल्याने येणाऱ्या रुग्णांची संख्या गतवर्षी दुपटीने वाढलेली असून दररोज सुमारे अडीचशे रुग्ण येथे औषधोपचारासाठी येतात. हे रुग्णालय येथील मुख्य रस्त्यापासून तीनशे मीटर अंतरावर आहे; परंतु या ठिकाणी असलेला रस्ता हा पूर्णपणे उखडलेला व खराब झालेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रुग्णालयाच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी झाडे व झुडपे देखील वाढलेली आहेत, त्यामुळे येथे सरपटणाऱ्या प्राण्यांचा आणि भटक्‍या कुत्र्यांचा देखील उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. रात्रीच्या वेळेस रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रवास करण्यासाठी या रस्त्यावर दिव्यांची देखील व्यवस्था नसल्याने नागरिकांना अंधारातूनच जावे लागत आहे. यापूर्वी अनेकांना या रस्त्याने सापांचे “दर्शन’ झाले असल्याने नागरिकांच्या मनात या रस्त्याने जाताना भीती असते. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने या रस्त्याबाबत गंभीर दखल घेऊन, हा रस्ता दुरुत करून, रस्त्याच्या दुतर्फा पथदिव्यांची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.

  • रुग्णालयाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत यापूर्वी अनेकवेळा शिक्रापूर ग्रामपंचयातीच्या पदाधिकाऱ्यांना कळविले असून, याबाबत पत्र देधील दिले आहे; परंतु अद्यापही येथील रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही.
    – डॉ. वैजिनाथ काशिद, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक
  • येथील रुग्णालयाच्या रस्त्यासाठी शिक्रापूर येथील काही स्थानिकांनी स्वमालकीची जागा दिलेली असून, ती जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग झालेली नसल्याने या रस्त्यासाठी निधी टाकता येत नाही, त्यामुळे येथील रस्त्याच्या कामाला उशीर होतो आहे.
    – आर. आर. राठोड, शिक्रापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी
  • ग्रामीण रुग्णालयचा रस्ता लवकरच तात्पुरत्या स्वरूपात का होईना दुरूस्त करून घेण्यात येणार आहे.
    – जयश्री भुजबळ, सरपंच, शिक्रापूर

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)