शिक्रापुरात भरला सोळा वर्षांनी दहावीचा वर्ग

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथे 2002 – 2003 मधील दहावीत शिक्षण घेऊन पुढील शिक्षणानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता त्यामुळे जुन्या शालेय मित्र मैत्रिणींच्या तसेच शिक्षकांच्या शालेय आठवणींना तब्बल सोळा वर्षांनी उजाळा मिळाला आहे.
विद्याधाम प्रशाला शाळेचे माजी विद्यार्थी सुहास रुके, मनोज मचे, संजय राऊत, गणेश राऊत, अश्विनी भागवत, भाग्यश्री वाबळे यांच्या प्रयत्नातून या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी सचिन रुके, तुषार काळे, निलेश राऊत, शेरखान शेख, मिलिंद शिंदे, सुजित भोंगाळे, बबन रुके, भूषण शिर्के, किरण गायकवाड, वृषाली ढमढेरे, सरिता खरपुडे, वैशाली रुके, राणी खेडकर, केतकी भालके, रेखा बांडे, शकुंतला राऊत, अश्‍विनी वाजे, श्रद्धा दळवी, रुपाली भुजबळ, वर्षा वाबळे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वजण तब्बल सोळा वर्षांनी एकत्र आल्यामुळे अनेक जण एकमेकांना ओळखत देखील नव्हते तर प्रत्येकजण त्यांचे नाव सांगत असताना सर्वांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणीने हसू फुलत होते तर अनेक जणांना यावेळी भावना आवरता आल्या नाही. यावेळी शाळेतील जुने शिक्षक बाबुराव साकोरे, रामदास शिंदे, बाबुराव कोकाटे, दिगंबर नाईक, सुनील दिवटे, सुरेश गंगावने, उमेश शिंदे, संभाजी सोनवणे, मंगल शिंदे, शुभांजली झांबेकर, प्राचार्य नरेंद्र व्यवहारे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे सामाजोपायी उपक्रम राबवावे आम्ही शिक्षक आमच्या विद्यार्थ्यांसोबत आहोत असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यांना आकर्षक भेटकार्ड व शिक्षकांना भेटवस्तू भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे माजी दिवंगत शिक्षक भास्कर शिंदे, मोहन ढमढेरे, धर्मराज झेंडगे यांना आदरांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन संजय राऊत यांनी केले. भाग्यश्री वाबळे हिने आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)