शिक्रापुरात बनावट फेसबुक प्रकरणी दोघांना अटक

शिक्रापूर- कान्हूर मेसाई येथे नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मिडगुलवाडी येथील मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्याचा वापर केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांना त्यांच्याकडील मोबाईल जप्त करत अटक करण्यात आली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील युवती कान्हूर मेसाई येथे इयत्ता नववीत शिक्षण घेत असून या युवतीच्या नावे कोणीतरी फेसबुक अकाउंट बनवून ते वापरत होते. हे वापरत असताना त्या मुलीच्या भावाला फेसबुकवर बहिणीच्या नावाचे फेसबुक अकाउंट दिसून आले. यानंतर सदर मुलीच्या भावाला समजता त्याने बहिणीकडे चौकशी केल्यानंतर बनावट फेसबुक असल्याची बाब समोर आली. त्यांनतर शिक्रापूर पोलीस ठाण्यात येथे अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे व पोलीस नाईक विलास आंबेकर हे करत असताना त्यांनी सायबर विभागाकडून फेसबुक व त्याचा वापर होत असलेल्या मोबाईलची माहिती मिळाली. संतोष बाजीराव इचके (वय 21 वर्षे रा. लाखणगाव ता. आंबेगाव) आणि सुधीर सुभाष गोडसे (वय 32 वर्षे रा. खैरेवाडी ता. शिरूर) या दोघांना अटक केली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांचेकडील मोबाईल जप्त करून तपासणी केली. त्यांनी बनावट फेसबुक अकाउंट बनविले असल्याचे कबुल केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)