शिक्रापुरात पावसामुळे विद्युत खांब जमीनदोस्त

– वाड्या-वस्त्या अंधारात : महावितरण कंपनीचे दुर्लक्ष
शिक्रापूर – येथे अनेक ठिकाणी वाड्या-वस्त्यांवर असलेले विद्युत खांब आठवडाभरा पूर्वी झालेल्या पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे येथील वाड्या-वस्त्या अंधारात असून येथे कोसळलेल्या खाबांची दुरवस्था झाली आहे. याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचे आढळत आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे वाबळेवाडी येथे शिक्रापूर हिवरे रस्त्याचे कडेला असलेले कित्येक विद्युत खांब पावसामुळे जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे अनेकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. ज्या ठिकाणी खांब जमिनीवर कोसळले आहेत. त्या ठिकाणी नागरिकांची घरे आहेत परंतु खांब कोसळल्यानने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. येथील खांब कोसळून आठवडा उलटला तरी अद्याप त्याची दुरुस्ती झाली नाही. मात्र, कोसळलेला खांब सरळ करण्यासाठी मात्र अद्याप महावितरणचे कर्मचारी फिरकले नसल्याचे सांगण्यात येत आहेत.
या भागातील अनेक नागरिकांच्या घरावर विद्युतप्रवाहाच्या तारा लटकलेल्या असून येथील त्या झाडांमध्ये सुद्धा अडकलेल्या आहेत. तसेच या भागामध्ये जमिनीवर पडलेले खांब हे कमी प्रमाणात जमिनीत गाडले असल्याचे आढळत आहेत. त्यामुळे हे खांब सहजपणे कोसळून पडत आहेत. मात्र, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सर्व खांब उभे करून त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

  • लवकरच विद्युत खांब पूर्ववत करू – नितीन महाजन
    याबाबत शिक्रापूर विद्युत वितरण कार्यालयचे कार्यकारी अभियंता नितीन महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या भागामध्ये पावसामुळे पडलेले विद्युत खांब उभे करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा समूह आला आहे. परंतु सर्वत्र चिखल असल्याने काम करणे शक्‍य नव्हते. त्यामुळे हे कर्मचारी परत गेले आहेत. लवकरच पुन्हा कर्मचारी उपलब्ध करून घेत सर्व खांब पूर्ववत करू.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)