शिक्रापुरात दशक्रियेत आरोग्यविषी मार्गदर्शन

शिक्रापूर- येथील किसनाबाई बाबूराव विटकर यांचे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमसाठी पुणे येथील मधुमेह तज्ञ डॉ. अतुल भस्मे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी डॉक्‍टरांनी उपस्थितांना आरोग्यविषयक माहिती दिली.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विटकर कुटुंबीयातील दशक्रिया निमित्ताने उपसरपंच आबाराजे मांढरे यांच्या प्रयत्नातून डॉक्‍टरांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी डांक्‍टरांनी उपस्थितांना मधुमेह होण्याची कारणे, लक्षणे, आहार नियंत्रण, व्यायाम, मधुमेह नियंत्रण आणि उपाय, मधुमेह झाल्यानंतर होणाऱ्या जखमांबाबतची काळजी तसेच उपाय, डोळ्यावर होणारा परिणाम, त्यासाठीच्या तपासण्या या सर्व बाबींची सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. तसेच नागरीकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच आबासाहेब करंजे, पुणे प्रादेशिक बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, सणसवाडीचे माजी सरपंच दत्तात्रय हरगुडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, जातेगावचे माजी सरपंच समाधान डोके, ग्रामपंचायत सदस्य सुनील खैरे, ग्रामसेवक युनियन पुणे जिल्हा माजी अध्यक्ष श्रीकांत ढमढेरे तसेच वडार समाजासाठी राज्यभर काम करणाऱ्या विवीध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक स्वागत केले. तर तालुक्‍यात दशक्रीयावेळी आरोग्यविषयी व्याख्याने घेतली जावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे अशी व्याख्याने आयोजित करण्यासाठी आबाराजे मांढरे पाटील यांनी पुण्यातील विविध आजारावरील 11 नामवंत तज्ञ डॉक्‍टरांची विनामोबदला व्याख्याने कमिटी स्थापन केलेली आहे. कोणालाही दशक्रिया कार्यक्रमसाठी डॉक्‍टराची गरज असल्यास आबाराजे यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन देखील केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)